आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शमीने सामना बरोबरीत रोखला, तर रोहितने सुपर ओव्हरच्या शेवटच्या 2 चेंडूत 2 षटकार मारून विजय खेचून आणला

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या विजयासह भारताने न्यूझीलंडमध्ये पहिली टी-20 मालिका जिंकली
  • न्यूझीलंडने सुपर ओव्हरमध्ये 17 धावा केल्या, रोहित आणि राहुलने 20 धावा करत सामाना खिशात घातला

स्पोर्ट डेस्क - हॅमिल्टन येथील तिसऱ्या टी-20 सामन्यात भारताने न्यूझीलंडवर सुपरओव्हरमध्ये रोमहर्षक विजय मिळवला. या विजयासोबत भारताने न्यूझीलंडमध्ये पहिली टी-20 मालिका जिंकली आहे. भारताने 5 सामन्यांची मालिका 3-0 अशा फरकाने आपल्या खिशात घातली आहे.
भारताने प्रथन फलंदाजी करताना 20 षटकांत 5 विकेट्सवर 179 धावा केल्या होत्या. प्रत्यु्त्तरासाठी मैदानात उतरलेल्या न्यूझीलंडच्या संघाने देखील 20 षटकांत 179 धावा केल्या. न्यूझीलंडला शेवटच्या षटकात 9 धावांची गरज होती मात्र मोहम्मद शमीने फक्त 8 धावा दिल्या. त्याने शेवटच्या चेंडूवर रॉस टेलरला बाद करत सामना अनिर्णित राखला. सुपर ओव्हरमध्ये प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडने 17 धावा केल्या. तर भारताने 18 धावा करत सामना आपल्या खिशात घातला. या विजयासोबत भारताने मालिका देखील खिशात घातली आहे.  

बातम्या आणखी आहेत...