IND vs NZ T20: न्यूझीलंकडून भारताचा अवघ्या 4 धावांनी पराभव, 2-1 ने जिंकली मालिका
भारताचा गेल्या 10 टी-20 मालिकांमध्ये अजेय राहण्याचा विक्रम सुद्धा मोडला आहे.
-
स्पोर्ट्स डेस्क - न्यूझीलंडने 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतील शेवटच्या सामन्यात भारताला 4 धावांनी पराभूत केले आहे. यासोबत भारताला 2-1 च्या फरकाने मालिका सुद्धा किवींनी आपल्या नावे केली आहे. भारताने हा सामना जिंकल्यास न्यूझीलंडमध्ये टी-20 मालिका जिंकण्याची ही पहिलीच वेळ ठरली असती. परंतु, अवघ्या काही धावांनी भारताने स्वप्न भंगले आहे. एवढेच नव्हे, तर भारताचा गेल्या 10 टी-20 मालिकांमध्ये अजेय राहण्याचा विक्रम सुद्धा मोडला आहे. मॅचच्या सुरुवातीला रोहित शर्माने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. न्यूझीलंडने तूफान फलंदाजीसह पूर्ण 20 ओव्हर खेळले तसेच भारतासमोर विजयासाठी 212 धावांचे आव्हान दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना गडी गमवून फक्त 208 धावा पूर्ण केल्या.
न्यूझीलंडच्या 212 पैकी 132 धावा चौकार, षटकारांतून
टॉस हारल्यानंतर प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडने तूफान फलंदाजी केली. न्यूझीलंडच्या फलंदाजांनी 18 चौकार आणि 10 षटकार लावले. कॉलिन मुनरोने सर्वाधिक 72 धावा काढल्या. त्याने 40 बॉल खेळून आपल्या इनिंगमध्ये 5 चौकार आणि 5 षटकार लावले.असे होते दोन्ही संघ
भारत : रोहित शर्मा (कॅप्टन), महेंद्र सिंह धोनी (विकेटकीपर), शिखर धवन, ऋषभ पंत, विजय शंकर, दिनेश कार्तिक, हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, क्रुणाल पंड्या आणि के खलील अहमद.न्यूझीलंड : केन विल्यमसन (कॅप्टन), कॉलिन मुनरो, ब्लेयर टिकनेर, रॉस टेलर, टिम सिफर्ट (विकेटकीपर), कॉलिन डी ग्रँडहोम, जेम्स नीशम, मिशेल सॅन्टनर, डेरिल मिशेल, टिम सौदी, ईश सोधी.