कसोटीची तयारी / कसोटीपूर्वी तयारीची अखेरची संधी, सर्वात मोठा प्रश्न - सलामीला कोण?

सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील खेळाडूंनी न्यूझीलंडमधील काही पर्यटनस्थळांना भेट दिली. यादरम्यान त्यांनी फाेटाेसेशन केले. सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील खेळाडूंनी न्यूझीलंडमधील काही पर्यटनस्थळांना भेट दिली. यादरम्यान त्यांनी फाेटाेसेशन केले.

  • भारत-न्यूझीलंड इलेव्हनविरुद्ध तीनदिवसीय लढत
  • शुभमन गिल सलामीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर
     

वृत्तसंस्था

Feb 14,2020 09:07:00 AM IST

हॅमिल्टन - टी-२० मालिका ५-० ने जिंकल्यानंतर भारताचा आत्मविश्वास वाढला होता. मात्र, वनडे मालिका ०-३ ने गमावल्यानंतर चिंता वाढली. त्यापेक्षा अधिक चिंता त्याच्या पुढे आहे. पहिली - कसोटी मालिकेत मयंक सोबत सलामी कोण करेल आणि दुसरी - रवींद्र जडेजा व आर. अश्विन पैकी काेणत्या फिरकीपटूला अंतिम अकरात स्थान मिळेल. या दोन प्रश्नांची उत्तरे शुक्रवारपासून सुरू होत असलेल्या सराव सामन्यात शोधावे लागेल. संघ व्यवस्थापन सराव सामन्यात चांगले प्रदर्शन करणाऱ्या खेळाडूला संधी देऊ शकतो. मयंक सोबत सलामीला शुभमन गिल किंवा पृथ्वी शॉ यांच्यात चढाओढ आहे. दुसरीकडे, जर भारत पाच गोलंदाजांसह उतरेल, तर जडेजा सोबत अश्विनसाठी देखील दरवाजे खुले असतील. ही दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेपूर्वी भारतीय संघाकडे तयारीची अखेरची संधी आहे. भारतीय संघाने टी-२० मालिका जिंकून दाैऱ्याला दमदार सुरुवात केली.


भारताचा तगड्या संघासोबत सराव सामना


सराव सामन्यात भारताचा सामना तगड्या संघासोबत होतोय. फिरकीपटू ईश सोढी, अष्टपैलू जेम्स नीशाम व यष्टीरक्षक टीम सीफर्टला न्यूझीलंड इलेव्हनमध्ये स्थान मिळाले आहे. डेरिल मिचेल संघाचे नेतृत्व करेल. यातील कामगिरीला महत्वाचे स्थान आहे.

शुभमन गिल सलामीच्या शर्यतीत सर्वात आघाडीवर

रोहित शर्मा दुखापतीमुळे कसोटी संघाबाहेर आहे. मयंक अग्रवालचे सलामीला येणे निश्चित आहे. रोहितच्या अनुपस्थितीत त्याच्यासोबत इतर सलामीवीरला जबाबदारी पेलावी लागेल. पृथ्वी शॉने यापूर्वी कसोटीत सलामी दिली आहे. त्याने पदार्पणात कसोटीत शतक झळकावले. पृथ्वीला वनडेत पदार्पणाची संधी मिळाली होती, मात्र तो विशेष काही करू शकला नाही.

भारताची वेगवान गोलंदाजी कामगिरी ठरतेय सुमार

भारताचे वेगवान आक्रमण सध्या खराब आहे. कारण - जसप्रीत बुमराह न्यूझीलंड विरुद्ध वनडेमध्ये एकही विकेट घेऊ शकला नाही. इशांत शर्मा सध्या जखमी आहे आणि तो रिहॅब करतोय. ताे सराव सामना खेळणार नाही. हे दोन्ही खेळाडू कसोटीत भारताकडून सध्या सर्वश्रेष्ठ आहेत. बुमराह गत वर्षी अखेरची कसोटी खेळला होता. त्यानंतर तो जखमी झाल्यानंतर बाहेरच होता.

संभाव्य संघ

भारत - कोहली (कर्णधार), मयंक , पृथ्वी शॉ, पुजारा, रहाणे, साहा, विहारी, रवींद्र जडेजा, बुमराह, शमी, उमेश, अश्विन, ऋषभ, नवदीप सैनी, शुभमन गिल.

न्यूझीलंड इलेव्हन - मिचेल (कर्णधार), अॅलेन, टॉम ब्रूस, क्लीवर, कूपर, स्कॉट कगेलजिन, नीशाम, रवींद्र, सीफर्ट, ईश साेढी, ब्लेयर टिकनेर, विल यंग.

X
सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील खेळाडूंनी न्यूझीलंडमधील काही पर्यटनस्थळांना भेट दिली. यादरम्यान त्यांनी फाेटाेसेशन केले.सामन्याच्या पूर्वसंध्येला भारतीय संघातील खेळाडूंनी न्यूझीलंडमधील काही पर्यटनस्थळांना भेट दिली. यादरम्यान त्यांनी फाेटाेसेशन केले.