टी-20 मालिका / सलामीच्या लढतीवर पाणी फेरले; सामना झाला रद्द!

पावसाच्या व्यत्ययामुळे टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका सामना रद्द

Sep 17,2019 02:08:14 PM IST

धर्मशाळा - यजमान टीम इंडिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील सलामीच्या टी-२० सामन्यावर रविवारी पाणी फेरले. पावसाच्या व्यत्ययामुळे धर्मशाळा येथील मैदानावरचा हा पहिला टी-२० सामना रद्द करण्यात आला. भारत आणि आफ्रिका या संघातील तीन टी-२० सामन्यांच्या मालिकेला सुरुवात झाली. मात्र, पहिल्याच सामन्याला पावसाचा माेठा फटका बसला. आता मालिकेतील दुसरा टी-२० सामना बुधवारी माेहालीच्या मैदानावर हाेणार आहे.

धर्मशाळा येथे दाेन दिवसांपासून सातत्याने पाऊस पडत आहे. त्यामुळे हा सामना रद्द करण्यात आला. तब्बल चार वर्षांनंतर या दाेन्ही संघांतील सामना पावसामुळे रद्द झाला आहे. यापूर्वी २०१४ मध्येही तीन सामन्यांच्या मालिकेतील एक सामना पाण्यात गेला हाेता.

X