आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs South Africa 2nd T20I Live: India (IND) Vs South Africa (RSA) Live Cricket Match Score News Update

भारताचा दक्षिण अफ्रिकेवर दणदणीत विजय, विराट कोहलीने मोडला रोहित शर्माचा 'तो' रेकॉर्ड

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारताने बुधवारी मोहालीमध्ये खेळल्या गेलेल्या दुसऱ्या टी-20 मध्ये दक्षिण अफ्रीकेला 7 विकेट्सनी पराभूत केले. भारतीय संघाने तीन सामन्यांच्या सीरीजमध्ये 1-0 ने बढत मिळवली आहे. यासोबत भारताने पहिल्यांदा दक्षिण अफ्रीकेला भारतात हरवले आहे. टी-20 मध्ये भारताचा हा सलग चौथा विजय आहे. मागील तीन सामन्यात भारताने वेस्टइंडीजला हरवले होते. दक्षिण अफ्रिकेने पहिल्यांदा फलंदाजी करत 20 ओव्हरमध्ये 5 विकेट गमावून 149 रन बनवले. भारताने 19 ओव्हरमध्येच 3 विकेट गमावून 151 रन बनवून सामना आपल्या नावावर केला. आता तिसरा आणि शेवटचा टी-20 सामना 22 सप्टेंबरला बंगळुरूमध्ये होणार आहे.भारताचा कर्णधार विराट कोहलीने नाबाद 72 रन काढले. त्याने 22 व्या वेळेस टी-20 मध्ये 50+ स्कोर केला. आता कोहलीने रोहित शर्मा (21)ला मागे टाकले आहे. कोहली टी-20 मध्ये सर्वात जास्त रन बनवणारा फलंदाज ठरला आहे. यात त्याने रोहितला मागे टाकले आहे. कोहलीच्या नावावर 2441 आणि रोहितच्या नावावरर 2434 रन आहे.

बातम्या आणखी आहेत...