आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

घरच्या मैदानावर आफ्रिकेविरुद्ध पहिल्या मालिका विजयाकडे टीम इंडियाची नजर, युवा गोलंदाजांसाठी मालिका महत्त्वाची

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

धर्मशाळा - भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील पहिला टी-२० सामना रविवारी धर्मशाळा येथे खेळवला जाईल. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ विजयी सलामीसाठी सज्ज आहेत. टीम इंडियाने आपल्या यजमानात तीन विश्वविजेता वेस्ट इंडिया, श्रीलंका, इंग्लंडसह ५ संघांविरुद्ध टी-२० मालिका जिंकली. केवळ दक्षिण आफ्रिकेला हरवू शकला नाही. २०१५ मध्ये झालेल्या मालिकेत द. आफ्रिकेने २-० ने विजय मिळवला. विंडीज विरुद्ध टीम इंडियाने टी-२० मालिका ३-० ने जिंकली होती. अशात ते ही विजयी लय कायम ठेवू इच्छिते. मात्र, आपल्या यजमानात टीम इंडियाने अखेरची टी-२० मालिका फेब्रुवारी २०१९ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध खेळली होती.

धर्मशाळेत यजमान संघ अपयशी, सामन्यावर पावसाचे सावट
पहिला सामना धर्मशाळा येथे होईल. यादरम्यान पावसाची शक्यता आहे. भारताने येथे केवळ एकच टी-२० सामना खेळला आहे. २०१५ मध्ये दक्षिण आफ्रिका विरुद्ध झालेल्या सामन्यात आपला ७ गड्यांनी पराभव झाला होता. टीम इंडियाने प्रथम खेळताना ५ बाद १९९ धावा केल्या होत्या. रोहित शर्माने शानदार फलंदाजी करताना १०६ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकाने १९.४ षटकांत ३ विकेट २०० धावा काढत सामना जिंकला.  डुमिनीने ६२ व डिव्हिलर्सने ५१ धावा काढल्या. मात्र दोन्ही खेळाडूंनी आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. भारताने आपल्या घरच्या मैदानावर ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंड विरुद्ध देखील टी-२० मालिका जिंकली आहे. 

टी-२० मध्ये : भारताने दक्षिण आफ्रिकेपेक्षा अधिक सामने जिंकले
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात १३ टी-२० सामने खेळवण्यात आले. भारताने ८ आणि दक्षिण आफ्रिकेने ५ सामने जिंकले. केवळ टी-२० प्रकारात भारत द. आफ्रिकेविरुद्ध अधिक सामने जिंकू शकला आहे. कसोटीत दोघांमध्ये ३६ सामने झाले. भारताने ११ आणि द. आफ्रिकेने १५ सामने जिंकले. वनडेमध्ये भारताने ३५ आणि द. आफ्रिकेने ४६ लढती जिंकल्या आहेत.

पिच रिपोर्ट:   आतापर्यंंत  सहा टी-२० सामने झाले. यात एका डावाची सरासरी १८० धावांपेक्षा अधिक आहे. चार वेळा प्रथम फलंदाजी करणाऱ्या संघाचा व प्रत्युत्तरातील संघाचा दाेन वेळा विजय नाेंद झाला आहे.

युवा गोलंदाजांसाठी मालिका महत्त्वाची  
पुढील वर्षी ऑस्ट्रेलिया होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी भारताला केवळ २७ टी-२० सामने खेळायचे आहेत. अशात टीम इंडिया अधिक युवा खेळाडूंना संधी देईल. वेगवान गोलंदाज दीपक चहर, खलील अहमद, नवदीप सैनीसह फिरकीपटू वॉशिंग्टन संंुदर, राहुल चहर आणि कृणाल पांड्या मालिकेत आपली छाप सोडू इच्छितात. विंडीज दौऱ्यातून बाहेर असलेला हार्दिक पांड्या पुनरागमन करेल. मनीष पांडेने विंडीज दौऱ्यावर टी-२० मध्ये काही विशेष प्रदर्शन करू शकला नाही. अशात वनडेत चांगले प्रदर्शन करणारा श्रेयस अय्यरला संधी देण्यात येऊ शकते.