• india vs south africa first test match update

पहिली कसाेटी/तिसरा दिवस / दाेन्ही डावांत 3 सलामीवीरांच्या 150+ धावा; 2263 कसाेटींत फक्त दुसऱ्यांदा

31 डिग्री तापमान आणि 80 टक्के आर्द्रतेमुळे घामाघूम झालेल्या एल्गरच्या ताेंडावर पाणी मारताना ट्रेनर. 31 डिग्री तापमान आणि 80 टक्के आर्द्रतेमुळे घामाघूम झालेल्या एल्गरच्या ताेंडावर पाणी मारताना ट्रेनर.

आफ्रिकेच्या यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डिकाॅकचे (111) शतक

वृत्तसंस्था

Oct 05,2019 09:54:00 AM IST

विशाखापट्टणम - सलामीवीर डिन एल्गर (१६०) आणि यष्टिरक्षक फलंदाज क्विंटन डिकाॅक (१११) यांनी शानदार शतकाच्या बळावर दक्षिण आफ्रिका संघाने शुक्रवारी भारताविरुद्ध सलामीच्या कसाेटीत दमदार कमॅबक केले. याच शतकाच्या आधारे आफ्रिकेने पहिल्या डावात तिसऱ्या दिवसअखेर ८ बाद ३८५ धावा काढल्या. अद्याप ११७ धावांनी पिछाडीवर असलेल्या आफ्रिकेकडे दाेन विकेट शिल्लक आहेत. मुुथुस्वामी (१२) व केवश महाराज (३) खेळत आहेत.


कसाेटीच्या इतिहासात आेव्हरआॅल दुसऱ्यांदा सुरुवातीच्या दाेन्ही डावांत तीन सलामीवीरांनी १५०+ धावांची खेळी केली आहे. यात यजमान टीम इंडियाकडून राेहित शर्मा (१७६) आणि मयंक अग्रवालने (२१५) यांनी ही खेळी केली. त्यापाठाेपाठ दक्षिण आफ्रिका संघाच्या सलामीवीर डिन एल्गरने पहिल्या डावात शानदार शतक झळकावले. त्याने १६० धावांचे याेगदान दिले.

  • ९ वर्षांनंतर आफ्रिकन फलंदाजाचे शतक :

भारताच्या मैदानावर शतकासाठी आफ्रिकला नऊ वर्षांपर्यंत मेहनत करावी लागली. एल्गरने पहिल्या डावात १६० धावांची खेळी केली. यासह २०१० नंतर भारतात कसाेटी शतक साजरे करणारा एल्गर हा पहिला आफ्रिकन फलंदाज ठरला.

  • डिकाॅकची संगकारा, गिलख्रिस्टशी बराेबरी

आफ्रिकन यष्टिरक्षक फलंदाज डिकाॅकने भारतात आेव्हरआॅल (कसाेटी, वनडे, टी-२०) तिसरे शतक साजरे केले. यासह त्याने यात आॅस्ट्रेलियाच्या अॅडम गिलख्रिस्ट, झिम्बाव्वेच्या फ्लाॅवर व श्रीलंकेच्या कुमार संगकाराची बराेबरी साधली.

  • एल्गर-डिकाॅकचे षटकाराने शतक पूर्ण : दुसऱ्यांदा नाेंद

एल्गर व डिकाॅकने षटकारासह आपले वैयक्तिक शतक साजरे केले आहे. या दाेघांनीही अश्विनच्या चेंडूवर षटकार ठाेकून शतक पूर्ण केले. २००२ मध्ये आॅस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंग व स्टीव्ह वाॅने हा पराक्रम पाकविरुद्ध सामन्यात गाजवला हाेता.

  • २६ महिने, २७ डावांनंतर फिरकीपटू आर. अश्विनने मारला विकेटचा पंच

टीम इंडियाच्या फिरकीपटू अश्विनने पहिल्या डावामध्ये विकेटचा जबरदस्त पंच मारला. त्याने १२८ धावा देताना आतापर्यंत पाच विकेट घेतल्या आहेत. त्याने २६ महिने आणि २७ डावानंतर हे एका डावात पाच बळी घेण्याचा पराक्रम गाजवला आहे. त्याने आॅगस्ट २०१७ मध्ये श्रीलंकेविरुद्ध कसाेटी सामन्यात पाच बळी घेतले हाेते .अश्विनने आता आेव्हरआॅल कसाेटीत २७ व्यांदा पाचपेक्षा अधिक बळी घेतले. यातील २१ वेळचा पराक्रम त्याने घरच्या मैदानावरच गाजवला.

X
31 डिग्री तापमान आणि 80 टक्के आर्द्रतेमुळे घामाघूम झालेल्या एल्गरच्या ताेंडावर पाणी मारताना ट्रेनर.31 डिग्री तापमान आणि 80 टक्के आर्द्रतेमुळे घामाघूम झालेल्या एल्गरच्या ताेंडावर पाणी मारताना ट्रेनर.
COMMENT