आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Vs South Africa Live Score, Pune Test, Day 2 Virat Kohli 7th Double Century

कोहलीने 7 वे द्विशतक मारून टेस्टमध्ये 7000 रन पूर्ण केले, सचिन-सेहवागसहित 6 खेळाडूंना सोडले मागे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क- भारत आणि दक्षिण अफ्रीकेदरम्यान तीन टेस्टच्या सीरीजचा दुसरा सामना पुण्यात खेळला जात आहे. टेस्टच्या दुसऱ्या दिवसी शुक्रवारी भारताने 5 विकेट्स गमावून 601 रनावर आपली खेळी घोषित केली. दक्षिण अफ्रीकेच्या थिउनिस डी ब्रुईन आणि एनरिच नोर्त्जे क्रीजवर खेळत आहेत. एडेन मार्करामने एक रनही न बनवता बाद झाला. डीन एल्गर 6 रनावर आउट झाला. दोघांनाही उमेश यादवने आउट केले. टेम्बा बवुमा(8)ला मोहम्मद शमीने आउट केले. भारतीय कर्णधार विराट कोहलीने नाबाद 254 रन काढले तर, रविंद्र जडेजाने 91 रनांची दमदार खेळी खेळली.

कोहलीने आपल्या टेस्ट करिअरचे 7वे द्विशतक लगावले. असे करणारा तो जगातील सहावा आणि भारतातील पहिला खेळाडू ठरला आहे. कोहलीने सचिन तेंडुलकर, विरेंद्र सेहवाग, रिकी पोंटिंग, जावेद मियांदाद, युनिस खान आणि मर्वन अटापट्टूला मागे सोडले.

कोहलीचे टेस्टमध्ये 7 हजार रन पुर्ण
 
कोहलीने टेस्टमध्ये 7000 रन पुर्ण केले. कर्णधारपदी राहून सर्वात जास्त द्विशतक लगावणारा तो एकमेव खेळाडू झाला आहे. त्याच्या आधी सर डॉन ब्रॅडमैनने 6 द्विशतक लगावले होते. कोहलीने टेस्ट करिअरमध्ये 26वे शतक लगावले आहे. तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 40 शतक लगावणारा पहिला भारतीय आणि जगातील दुसरा कर्णधार बनला आहे. त्याच्या आधी ऑस्ट्रेलियाच्या रिकी पोंटींगने 41 शतक लगावले आहे.