• india vs south africa test cricket news and updates

दुसरी कसोटी / भारतीय सलामीवीराचे आफ्रिकेविरुद्ध नऊ वर्षांनंतर सलग २ कसाेटीत शतके

सलामीवीर मयंकचे शतक; यापूर्वी २०१० मध्ये सेहवागची अशी कामगिरी

वृत्तसंस्था

Oct 11,2019 10:23:00 AM IST

पुणे - सलामीच्या लढतीत शतकी खेळीचा पुन्हा एकदा कित्ता गिरवत टीम इंडियाच्या सलामीवीर मयंक अग्रवालने (१०८) गुरुवारी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दुसऱ्या कसाेटीतही लक्षवेधी कामगिरी केली. त्याने दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावाच्या पहिल्याच दिवशी शानदार शतक साजरे केले. याच्या शतकाच्या बळावर भारतीय संघाने पुण्याच्या मैदानावरील दुसऱ्या कसाेटीच्या पहिल्या डावात दिवसअखेर ३ बाद २७३ धावा काढल्या. यात चेतेश्वर पुजारा (५८) आणि काेहलीच्या (नाबाद ६३) अर्धशतकांचेही माेलाचे याेगदान आहे. अंधुक प्रकाशामुळे पहिल्या दिवसाचा खेळ ८५.१ षटकांपर्यंतच हाेऊ शकला. आता मैदानावर कर्णधार काेहली आणि अजिंक्य रहाणे (१८) खेळत आहेत. आफ्रिकेकडून कागिसाे रबाडाने सर्वाधिक ३ बळी घेतले.

नाणेफेक जिंकून भारताने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार काेहलीचा हा निर्णय सलामीवीर मयंक अग्रवाल आणि तिसऱ्या स्थानावरील चेतेश्वर पुजाराने याेग्य ठरला. या दाेघांनी दुसऱ्या विकेटसाठी १३८ धावांची भागीदारी रचली.

मयंकचे दुसरे शतक :

भारताकडून मयंक अग्रवालने १०८ धावांची खेळी केली. त्याचे दुसरे कसाेटी शतक ठरले. नऊ वर्षांनंतर आफ्रिकेविरुद्ध सलग दुसऱ्या कसाेटीत शतक ठाेकणारा मयंक हा पहिला सलामीवीर ठरला.यापूर्वी सेहवागने २०१० मध्ये असा पराक्रम गाजवला.

चाैथ्यांदा मालिकेत भारतीय सलामीवीरांची ४ शतके

चाैथ्यांदा भारतीय सलामीवीरांनी कसाेटी मालिकेत चार शतके साजरी केली. यापेक्षा अधिक शतके इतर काेणत्याही मालिकेत नाेंद नाहीत. अद्यापही या मालिकेच्या दुसऱ्या कसाेटीची तीन डावातील खेळी बाकी आहे.

विहारीच्या जागी उमेश

भारत व आफ्रिकेने यासाठी संघात प्रत्येकी १ बदल केला. ही खेळपट्टी वेगवान गाेलंदाजांसाठी पाेषक आहे. त्यामुळे भारताने बॅटिंग आॅलराउंडर हनुमा विहारीच्या वेगवान गाेलंदाज उमेश यादवला संधी दिली. आफ्रिकेने वेगवान गाेलंदाज अनरिच नाेर्टजला पदार्पणाची संधी दिली. त्याने पहिल्या दिवशी १३ षटके गाेलंदाजी करताना ६० धावा दिल्या आहेत.

मालिकेत ४ शतके साजरे करणारे भारतीय सलामीवीर

सलामीवीर शतक प्रतिस्पर्धी वर्ष

> सुनील गावसकर 4 भारतविंडीज 1970
> सुनील गावसकर 4 भारतविंडीज 1978
> वीरेंद्र सेहवाग 2 भारतश्रीलंका 2009
> गौतम गंभीर 2 भारतश्रीलंका 2009
> रोहित शर्मा 2 भारतद. आफ्रिका 2019
> मयंक अग्रवाल 2 भारतद. आफ्रिका 2019


५० व्या कसाेटीत नेतृत्व; विराट दुसरा भारतीय

काेहलीची कर्णधाराच्या भुमिकेत ही ५० वी कसाेटी आहे. नेतृत्वात अर्धशतकी कसाेटी खेळणारार काेहली हा धाेनीनंंतर दुसरा भारतीय कर्णधार ठरला आहे.

कर्णधार महेंद्रसिंग धोनी विराट कोहली सौरव गांगुली

नेतृत्वात सामने 60 50* 49

विजय 27 29 21

X
COMMENT