आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

World Cup 2019 / एकाच दिवशी दोन सामने: 45 लढतींनंतर आज ठरणार नंबर वन संघ, असे आहे आजच्या सामन्यांचे गणित!

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लीड्स मँचेस्टर - विश्वचषक २०१९ चे अंतिम दोन साखळी सामने शनिवारी खेळवले जातील. पहिला सामना भारत व श्रीलंका यांच्यात आणि दुसरा सामना ऑस्ट्रेलिया व दक्षिण आफ्रिका यांच्यात होईल. दोन्ही सामन्यांनंतर नंबर १ आणि नंबर २ च्या संघांचा निर्णय होईल. म्हणजे ३० मेपासून सुरू झालेल्या स्पर्धेत ३८ दिवस व ४५ सामन्यांनंतर अव्वल दोन संघांचा निर्णय होणार आहे. ऑस्ट्रेलियाने सामना जिंकल्यास गुणतालिकेत अव्वल स्थानावर राहील. तो पराभूत झाल्यास भारत विजयानंतर अव्वल संघ बनेल. दोन्ही संघ पराभूत झाल्यास ऑस्ट्रेलिया नंबर वन राहील. स्पर्धेत नंबन वन संघ चौथ्या क्रमांकाच्या संघाशी दोन हात करेल. दुसऱ्या क्रमांकाच्या टीमचा सामना तिसऱ्या क्रमांकावरील इंग्लंडशी होईल.


भारताची चिंता केवळ अर्धशतक झळकावणारी मधली फळी :
भारताच्या फलंदाजीत आघाडीचे रोहित शर्मा, विराट कोहली आणि लाेकेश राहुल चांगल्या फाॅर्मात आहेत. मात्र मधल्या फळीतील (४ ते ७ क्रमांक) फलंदाजीची चिंता कर्णधाराला आहे. सात सामन्यांत मधल्या फळीतील फलंदाजांनी केवळ २ अर्धशतके काढली आहेत. कोणताच खेळाडू मोठी खेळी करू शकला नाही. अखेरच्या सामन्यात केदारच्या ऐवजी बांगलादेशविरुद्ध दिनेश कार्तिकला संधी देण्यात आली. मात्र, तो काही विशेष काही करू शकला नाही. अशात केदार जाधवला पुन्हा आजच्या लढतीत संधी दिली जाऊ शकते. त्याने एक अर्धशतक ठोकले आहे. फिनिशर महेंद्रसिंग धोनीला फटाफट धावा कराव्या लागतील. युवा खेळाडू ऋषभ पंत वेगाने धावा करण्याचा प्रयत्न करतोय. अष्टपैलू हार्दिक पांड्यासह वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह, मो. शमी आणि भुवनेश्वरचे प्रदर्शनही चांगले राहिले. 

 

श्रीलंकेची संपूर्ण टीमच अपयशी

स्पर्धेत श्रीलंकेची संपूर्ण टीमच अपयशी ठरली. अखेरच्या सामन्यात अविष्का फर्नांडोने वेस्ट इंडीजविरुद्ध शतक झळकावले. हे संघाकडून एकमेव शतक ठरले. कुशल परेराने ३ आणि कर्णधार करुणारत्नेने दोन अर्धशतके काढली. टीमचा अनुभवी खेळाडू अँजेलो मॅथ्यूज केवळ एकमेव अर्धशतक करू शकला. गोलंदाजीत मलिंगाने सर्वाधिक १२ विकेट घेतल्या. त्यांचा इतर गोलंदाज ५ पेक्षा अधिक बळी घेऊ शकला नाही. संपूर्ण संघाचे प्रदर्शन खराब आहे. 

 

> खेळपट्टी : विश्वचषकातील ३ सामन्यांत एका डावात ३००+ धावा. दोन वेळा प्रथम फलंदाजी करणारी टीम विजयी. नाणेफेक जिंकणारी टीम प्रथम फलंदाजी घेऊ शकते. 

> हवामान : १३ ते २१ डिग्री सेल्सियसदरम्यान तापमान राहील. पावसाची शक्यता नाही.