आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आज भारत आणि विंडीज आमनेसामने : विंडीजविरुद्ध २८ वर्षांपासून वर्चस्व; आजच्या विजयाने भारत उपांत्य फेरीत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मँचेस्टर - सलगच्या विजयाने जबरदस्त फाॅर्मात असलेला भारतीय संघ आता यंदाच्या विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठण्यासाठी सज्ज झाला आहे. टीम  इंडिया ही सेमीफायनलच्या प्रवेशापासून अवघ्या एका पावलावर आहे. त्यामुळे एका विजयाने भारताचा उपांत्य फेरीतील प्रवेश निश्चित हाेणार आहे.


भारताचा स्पर्धेतील सहावा सामना आज गुरुवारी हाेणार आहे. या सामन्यात भारत आणि विंडीज हे दाेन्ही संघ समाेरासमाेर असतील. भारतीय संघाने मागील २७ वर्षांपासून विंडीज संघाविरुद्धची विजयी माेहीम कायम ठेवली आहे. १९९२ च्या विश्वचषकात विंडीजने भारतावर आपला शेवटचा विजय नाेंदवला हाेता. याशिवाय भारताने विंडीज संघाविरुद्धची पाच वनडे सामन्यांची मालिका गतवर्षी जिंकली. भारताने ३-१ ने ही मालिका  नावे केली हाेती.

 

भारताची बॅटिंग लाइनअप सरस : सध्या भारतीय संघाची बॅटिंग लाइनअप अधिक सरस मानली जाते. टीमची आघाडीची फळीही जबरदस्त फाॅर्मात आहे. यातूनच टीमला आतापर्यंत तीन सामन्यांत विजयाची नाेंद करता आली. 

 

विंडीजच्या चार खेळाडूंविरुद्ध असे डावपेच ठरतील फायदेशीर

 

क्रिस गेल : झटपट आणि स्वस्तात बाद करणे गरजेचे
> त्याचा सुरुवातीच्या २० चेंडूंचा स्ट्राइक रेट १२२.२२ असताे. ताे प्रत्येक पाचव्या चेंडूवर १  षटकार खेचताे.  सध्या  फास्ट बाउन्सरला काउंटर करू शकला नाही.
> १३० च्या स्पीडचा चेंडू आव्हान. या चेंडूवर ताे मिडल विकेट वा लाॅग आॅनवर बाद हाेऊन जाताे. 


 

शाई हाेप : झटपट बाद करणे ठरेल फायदेशीर 
> ताे  विश्वचषकातील काॅम्पेक्ट   फलंदाज. वेगवान गाेलंदाज आणि फिरकीपटूविरुद्ध त्याची सरासरी ४०+ असते.
> संथ चेंडूवर बाद केले जाऊ शकते. संथ चेंडूवर  डिफेन्सिव्ह खेळी. एकेरी धावा घेण्याचाही धाेका ताे पत्करत नाही.

 

काॅट्रेल :  वेगळेपण; टाॅप-ऑर्डरसाठी धाेकादायक
> गाेलंदाजीत वेगळेपण.  पुढचा चेंडू कसा येईल याचा फलंदाजाला अंदाज बांधता येत नाही. ताे कधी बाउन्सर तर, कधी शाॅर्ट आणि फुलटाॅस चेंडू टाकून फलंदाजाला अडचणीत आणताे. त्यामुळे भारताच्या आघाडीच्या फळीसाठी हा धाेकादायक ठरू शकेल.

 

ओशाने थाॅमस : सर्वाधिक विकेट गुड लेंथवर घेतल्या
> युवा गाेलंदाज आेशाने थाॅमस हा टाॅप-फ्लइट पेसर आहे. गुड लेंथ आणि शाॅर्ट बाॅल ही त्याची जमेची बाजू आहे. त्याने सर्वाधिक ४८.९० विकेट याच चेंडूवर घेतल्या.  
> ताे याॅर्करमध्ये अपयशी आहे. भारतीय फलंदाज याॅर्करवर तुफानी फटकेबाजी करतात.