आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता आणि कधीही नसेन, एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी वादग्रस्त वक्तव्य

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- एमआयएम प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रमुख मोहन भागवत यांच्या हिंदू राष्ट्राच्या वक्तव्यावर वादग्रस्त ट्वीट केले आहे. "भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन", असे ट्वीट ओवेसी यांनी केले आहे.
"भारतातील माझ्या इतिहासाला हिंदू हे नवं नाव देत ते मिटवू शकत नाही. त्यांची ही खेळी कधीच यशस्वी होणार नाही. ते लोकांना जबरदस्तीने सांगू शकत नाही की, आपली संस्कृती, पंथ आणि व्यक्तीगत ओळख सर्व हिंदू धर्माने जोडलेली आहे. भारत कधीच हिंदू राष्ट्र नव्हता, नाही आणि कधीही नसेन, इंशाल्लाह", असे ट्वीट ओवेसी यांनी केले.

पुढे ओवेसी यांनी ट्वीट केले की, "मोहन भागवतांच्या हिंदू राष्ट्राच्या वक्तव्याने काही फरक पडत नाही. भागवत आम्हाला परदेशी मुस्लीसांसोबत जोडण्याचे प्रयत्न करत आहेत. असे प्रयत्न केल्यामुळे माझ्या भारतीय असण्यावर काहीच परिणाम होणार नाही. हिंदू राष्ट्र हिंदू वर्चस्वासारखेच आहे, हे आम्हाला मान्य नाही. बहुसंख्याकाच्या मनाच्या मोठेपणामुळे नाही, तर आम्ही संविधानामुळे आनंदी आहोत."

काय म्हणाले होते मोहन भागवत ?


"भारत हिंदूंचा देश आहे, त्यामुळे सर्व धर्म येथे सुरक्षित आहेत. जगातील सर्वात सुखी मुस्लिम भारतात आहे. पारशी आणि यहूदी धर्मातील लोकही भारतात सुरक्षित आहेत. भारताला भविष्याकडे घेऊन जाण्याचा संघाचा उद्देश आहे. संघ फक्त विशिष्ट समाजाचा आहे, हा डाग संघावरुन निघून गेला पाहीजे, अशी माझी इच्छा आहे. संपूर्ण देश एका तारेने बांधलेला आहे.  भारत हिंदूंचा देश आहे. हिंदू एखाद्या पुजेचे नाव नाहीये. कोण्या भाषेचे नाव नाहीये. एखादे राज्य नाहीये. भारत एका संस्कृतीचे नाव आहे. जो भारतात राहणाऱ्या सर्वांचा सांस्कृतीक वारसा आहे. हा जगातील सर्व धर्मांचा आदर करणारा धर्म आहे. भारतातील लोक वेगळ्या संस्कृती, भाषा, भौगोलिक स्थानातले असूनही स्वतःला एक मानतात. या एकतेमुळे मुसलमान, पारशी यासारखे धर्म देशात सुरक्षित आहेत."