आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीम इंडियात आता हा गोलंदाज, जो विंडीजला करू देणार नाही 300 धावा

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - जगातील नंबर वन गाेलंदाज जसप्रीत बुमराह अाता पाहुण्या विंडीजविरुद्ध वनडेत अव्वल कामगिरी करण्यासाठी मैदानावर उतरणार अाहे. मालिकेतील उर्वरित तीन वनडे सामन्यांसाठी त्याची संघात निवड झाली. अाता मालिकेतील तीन वनडे सामने शिल्लक अाहेत. या सामन्यासाठी गुरुवारी भारताच्या संघाची घाेषणा करण्यात अाली. संघात भुवनेश्वर कुमारचीही निवड झाली अाहे. 


अाशिया चषकानंतर या दाेन्ही प्रतिभावंत वेगवान गाेलंदाजांना विश्रांती देण्यात अाली हाेती. मात्र, त्यांना निर्णायक सामन्यांसाठी संघात सहभागी करण्यात अाले. महागडा ठरलेल्या गाेलदंाज शमीला विश्रांती देण्यात अाली. त्याने दाेन सामन्यांत 140 धावा देत 3 बळी घेतले. 


बुमराहच्या 22 महिन्यांत सर्वाधिक 55 विकेट 
भारताचा अव्वल वेगवान गाेलंदाज जसप्रीत बुमराह सध्या जबरदस्त फाॅर्मात अाहे. त्याने 1 जानेवारी 2017 पासून अातापर्यंत 33 सामन्यात 24 च्या सरासरीने 55 विकेट घेतल्या. यादरम्यान ताे भारताकडून सर्वाधिक विकेट घेणारा भारताचा पहिला गाेलंदाज ठरला. 
संघ पुढीलप्रमाणे 


भारत : विराट काेहली (कर्णधार), राेहित शर्मा, शिखर धवन, अंबाती रायडू, ऋषभ पंत, महेंद्र सिंग धाेनी, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, यजुवेंद्र चहल, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, खलील अहमद, उमेश यादव, लाेकेश राहुल, मनीष पांडे. 

बातम्या आणखी आहेत...