भारत याच महिन्यात पाकिस्तानवर हल्ला करेल : भारतातील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पाकचा दावा

दिव्य मराठी

Apr 08,2019 09:57:00 AM IST

इस्लामाबाद - भारत १६ ते २० एप्रिल दरम्यान पाकिस्तानवर हल्ला करण्याची योजना आखत आहे, असा दावा पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री शाह महेमूद कुरेशी यांनी रविवारी केला. पाकिस्तान सरकारला याची विश्वसनीय माहिती मिळाल्याचे कुरेशींचे म्हणणे आहे.


मुलतान येथे रविवारी पत्रकारांशी बोलताना कुरेशी म्हणाले, ही कारवाई योग्य ठरवण्यासाठी एखादी घटनाही घडवली जाईल. यापूर्वी पंतप्रधान इम्रान खान यांनीही लोकसभा निवडणुकीपूर्वी मोदी सरकार पाकवर आणखी एक हल्ला करू शकते, असे वक्तव्य केले होते. पुलवामा येथे केंद्रीय राखीव पोलिस दलाच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला झाला होता. यात ४० जवान शहीद झाले होते. त्यानंतर भारतीय हवाई दलाने २६ फेब्रुवारी रोजी पाकच्या बालाकोटमध्ये जैश-ए-माेहंमदच्या तळांवर हल्ले केले होते. मोदींनी माध्यमांना तीन अड्डे उद्ध्वस्त केल्याची माहिती दिली. परंतु हा दावा करताना एकही पुरावा दिला नाही, असे कुरेशी म्हणाले.

X