आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Will Become Like Israel If The Citizenship Bill Is Passed, Criticizing Owaisi

नागरिकत्व विधेयक पारित झाल्यास भारत इस्रायलसारखा बनेल, ओवेसींची टीका

2 वर्षांपूर्वीलेखक: वृत्तसंस्था
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - नागरिकत्व दुरुस्ती विधेयक लाेकसभेत मांडण्यावरून गदाराेळ सुरू आहे. हे विधेयक पारित झाल्यास भारत इस्रायलसारखा देश हाेईल. इस्रायल टाेकाच्या भेदभावासाठी ओळखला जाताे. आपल्याला भारत धर्मावर आधारित देश करायचा आहे हेच विधेयकातील मसुद्यावरून वाटते, अशी टीका एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी केली आहे. त्याशिवाय मेहबूबा मुफ्ती यांच्या कन्या सना इल्तिजा जावेद यांनीही या विधेयकाला विराेध दर्शवला. हे विधेयक मुस्लिमविराेधी असल्याचा आराेप त्यांनी केला. 

ईशान्येकडील भागाला या विधेयकातून वगळण्यात येणार असल्याचे माध्यमातून कळते. ते खरे असल्यास एकाच देशात दाेन वेगवेगळे कायदे हे मूलभूत हक्काचे उल्लंघन करण्यासारखे ठरते. तसे झाल्यास धर्माच्या आधारे नागरिकत्व देण्याचा हा प्रकार आहे. ही बाब घटनेतील मूलतत्त्वांची पायमल्ली करणारी आहे, असा दावाही ओवेसी यांनी केला. भारतात आता मुस्लिमांसाठी जागा नाही. सरकार मुस्लिम समुदायाला दुर्बल करू इच्छिते, असा आराेप सना जावेद यांनी केला. त्यांनी ट्विटरवरून हा आराेप केला आहे. आता साेमवारी ९ डिसेंबरला ते लाेकसभेत मांडले जाईल. त्यानंतर ते वरिष्ठ सभागृहाच्या पटलावर ठेवले जाईल. लाेकसभेत भाजप व आघाडीतील घटक पक्षांच्या मदतीने या विधेयकाचा मार्ग सुकर हाेईल. बातम्या आणखी आहेत...