आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Will Have 186 Indian Cricketers At IPL Auction, Only Top 4 Players Are At Base Price

आयपीएल लिलाव टाॅप-4 बेस प्राइसमध्ये भारताचे चाैघेच, 186 भारतीय क्रिकेटपटूंवर लागणार बाेली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • 19 डिसेंबर राेजी हाेणार काेलकात्यात प्रक्रिया पूर्ण, एकूण 332 खेळाडू सहभागी, 73 जणांची हाेणार सत्रासाठी निवड
  • स्पर्धेच्या 13 व्या सत्रासाठी पंजाबच्या टीमकडे सर्वाधिक 42.70 काेटी शिल्लक

​​​​​मुंबई : आगामी १३ व्या सत्राच्या इंडियन प्रीमियर लीगसाठी (आयपीएल) १९ डिसेंबर राेजी काेलकात्यात लिलाव प्रक्रिया हाेणार आहे. या प्रक्रियेसाठी ३३२ खेळाडूूंच्या नावाची यादी तयार करण्यात आली आहे. यामध्ये भारताच्या १८६ खेळाडूंसह विदेशातील १४३ आणि असाेसिएशन देशाच्या तिघांचा समावेश आहे. यातील १९८ क्रिकेटपटू पहिल्यांदाच टी-२०च्या या लीगमध्ये खेळण्यासाठी उत्सुक आहेत. आठ संघ आता या प्रक्रियेतून ७३ खेळाडूंची निवड करणार आहेत. यामध्ये ४४ भारतीय आणि २९ विदेशी क्रिकेटपटू असतील. या ऑक्शनसाठी मूळ आधारभूत किंमत (बेस प्राइज) आठ स्लाॅटमध्ये विभागली आहेत. यात आठ स्लाॅटमध्ये २ काेटी, १.५ काेटी, १ काेटी, ७५ लाख, ५० लाख, ४० लाख, ३० लाख आणि २० लाखांचा समावेश आहे. टाॅप-४ बेस प्राइसमध्ये भारताच्या चार खेळाडूंचा समावेश आहे. म्हणजेच ४० भारतीय क्रिकेटपटूंन यात स्थान मिळवता अाले नााही. किंग्ज इलेव्हन टीमकडे लिलाव प्रक्रियेसाठी सर्वाधिक ४२.७० काेटी रुपये शिल्लक आहेत.

२० लाखांच्या बेसप्राइजमध्ये सर्वाधिक १६७ भारतीय खेळाडू, ५० लाखामध्ये विदेशाचे सर्वाधिक ६९

बेस प्राइज भारतीय विदेशी एकूण
2 काेटी रु.077
1.5 काेटी रु.1910
1 काेटी रु.32023
70 लाख रु.01616
50 लाख रु.96978
40 लाख रु.167
30 लाख रु.538
20 लाख रु.16716183

20 तेे 40 लाखांच्या गटातील खेळाडू यंदा नवीन.0 7 7

प्रत्येक संघाला ८५ काेटींचा खर्च करण्यासाठी संधी; २५ खेळाडू निवडण्याचा अधिकार

लीगमधील प्रत्येक संघ आता खेळाडूंच्या खरेदीसाठी ८५ काेटी रुपये खर्च करू शकेल. प्रत्येक संघात अधिकाधिक २५ खेळाडू हाेऊ शकतील. यासाठी संघामध्ये विदेशी आठ असतील. प्लेंइग-११ मध्ये फक्त चारच विदेशी खेळाडूंना मैदानावर संधी दिली जाईल. रिटेन केलेल्या खेळाडूंवर आता ८५ काेटींपेक्षा कमी खर्च केला जाईल. मुंबई इंडियन्स संघाकडे आता १३.०५ काेटी रुपये शिल्लक आहेत.

काेलकाता, राजस्थान व दिल्लीला प्रत्येकी ११ आणि मुंबईला ७ खेळाडूंच्या निवडीची आहे संधी

टीमखेळाडू विदेशी  शिल्लक र.शिल्लक खे.
किंग्स इलेवन पंजाब 16 442.70 काेटी9
कोलकाता नाइटराइडर्स 14435.65 काेटी11
राजस्थान रॉयल्स 14428.90 काेटी11
रॉयल चॅलेंजर्स 13227.90 काेटी12
दिल्ली डेयरडेविल्स 14327.85 काेटी11
सनरायझर्स हैदराबाद 18617.00 काेटी7
चेन्नई सुपरकिंग्स 20614.60 काेटी 5
मुंबई इंडियंस18613.05 काेटी7

सर्वात महागडे 2 काेटी च्या बेस प्राइसमध्ये पाच ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत सहभागी


लिन, ऑस्ट्रेलिया
कमिंस, ऑस्ट्रेलिया
मॅक्सवेल, ऑस्ट्रेलिया
मार्श, ऑस्ट्रेलिया
हेझलवुड, ऑस्ट्रेलिया
डेल स्टेन, द. अाफ्रिका
मॅथ्यूज, श्रीलंका

एक कोटी : इयान मोर्गन, जेसन रॉय, रॉबिन उथप्पा, क्रिस मॉरिस, क्रिस वोक्स, अॅडम झंम्पा, शॉन मार्श, डेविड विली, केन रिचर्ड्सन, कायल एबॉट.

दोन कोटी : अॅराेन फिंच, सॅम करेन, यूसुफ पठान, नाथन कुल्टर नाइल, टीम साउदी, आंद्रे टाई, जयदेव उनादकट, पीयूष चावला, मार्टिन गुप्टिल, एविन लेव्हिस, कोलिन मुनरो, मार्कस स्टोइनिस, मुस्तफिजुर रहमान, टॉम बेेनटन, एलेक्स हेल्स, रिली रोसो, टॉम करेन, एस्टन एगर, मोइसेस हेनरिक्स, डी आर्की शॉर्ट, लियाम प्लंकेट, जेम्स पॅटिंन्सन, तिसारा परेरा.

१२ देशांतील खेळाडूंवर लागणार अाहे बाेली

भारत : 186 
ऑस्ट्रेलिया : 35 
द. अाफ्रिका : 23 
इंग्लंड : 22 
वेस्ट इंडीज : 19 
न्यूझीलंड : 18 
श्रीलंका : 14 
अफगाणिस्तान : 7 
बांगलादेश : 5 
अमेरिका : 1 
यूएई : 1 
स्कॉटलंड : 1

- पाक खेळाडूंना सहभागासाठी अद्याप परवानगी नाही.
- मुंबई इंडियन्स संघाने सर्वाधिक चार वेळा जिंकला किताब
- काेहली ५४१२ धावा अाणि मलिंगा १७० सर्वाधिक बळींसह अव्वल.

प्रवीण तांबे सर्वात वयस्कर, नूर अहमद सर्वात युवा

भारताचा प्रवीण तांबे या लिलाव प्रक्रियेत सहभागी हाेणार अाहे. हा ४८ वर्षीय क्रिकेटपटू यंदाच्या लिलावात सहभागी हाेणारा सर्वात वयस्कर असेल. तसेच, अफगाणिस्तानच्या १५ वर्षीय फिरकीपटू नूर अहमदला यात संधी मिळाली हाेती. त्याने ७ टी-२० सामन्यांत अाठ विकेट घेतल्या अाहेत.

लिलावात सहभागी असतील सर्वाधिक १२८ ऑलराउंडर

ऑलराउंडर - 128 
गाेलंदाज - 104
फलंदाज - 66 
विकेटकीपर - 34