आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत २.६ कोटी हेक्टर पडीक जमीन शेतीयोग्य बनवणार : मोदी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॉप-१४ (कॉन्फरन्स ऑफ पार्टीज) परिषदेला संबोधित केले. परिषदेत ८ व्या दिवशी मोदी म्हणाले की, भारत २०३० पर्यंत २.६ कोटी पडीक जमिनीला शेतीयोग्य बनवेल. आधी लक्ष्य २.१ कोटी हेक्टर होते. २०१५ ते २०१७ पर्यंत देशात झाडे आणि वन क्षेत्रात ८ लाख हेक्टर वाढ झाली. भारत हवामान बदल, जैैव विविधता या क्षेत्रात काम करत आहे. मोदी म्हणाले की, तापमानात वाढ, मुसळधार पाऊस आणि वादळामुळे जमीन नष्ट होत आहे. पडीक जमीन ठीक केल्यास पाण्याचे संकटही सुटेल. आम्ही जलशक्ती मंत्रालय स्थापन केले आहे. ते पाण्याशी संबंधित समस्यांवर काम करते. पाणीपुरवठ्यात वाढ, पाणीसाठ्यात वाढ, जलप्रवाह धीमा करणे, मातीत ओलावा कायम ठेवणे हे जल रणनीतीचे भाग आहेत. भारत जमिनीला शेतीयोग्य बनवण्यासाठी रिमोट सेन्सिंग आणि अंतराळ तंत्रज्ञानाचा वापर करत आहे. आम्ही काही वर्षांत सिंगल यूज प्लास्टिकचा वापर संपवणार आहोत. इतर देशांनीही त्याला निरोप द्यावा, असे आमचे आवाहन आहे. हवामान बदलाचा नकारात्मक परिणाम संपूर्ण जगावर होत आहे.

यूएनसीसीडी: भारत अध्यक्ष झाला, आम्हाला अभिमान : मोदी

संयुक्त राष्ट्र : उपसरचिटणीस म्हणाल्या- सर्व देशांनी माती वाचवण्याला गती द्यावी
संयुक्त राष्ट्रांच्या उपसरचिटणीस अमिना मोहम्मद म्हणाल्या की, आम्ही अजेंडा २०३० बनवला होता. त्याचा एक तृतीयांश वेळ संपला आहे. सर्व देशांनी माती वाचवण्यास प्राधान्य द्यावे. जमीन, हवामान बदल आणि जैवविविधता यात संतुलन बनवून पर्यावरणाची सुुरक्षा केली जाऊ शकते.

पुढे काय : परिषदेला आले ८००० तज्ज्ञ, ३० पेक्षा जास्त निर्णय होऊ शकतात
भारताची २ वर्षांसाठी युनायटेड नेशन कन्व्हेेन्शन टू कॉम्बॅट डेझर्टिफिकेशनचा (यूएनसीसीडी) अध्यक्षपदी निवड झाली आहे. कॉप-१४ मध्ये जगभरातील ८००० पेक्षा जास्त लोक भाग घेत आहेेत. त्यात ३० पेक्षा जास्त निर्णय होऊ शकतात. त्याचा हेतू २०३० पर्यंत विविध उद्दिष्टे पूर्ण करणे हा आहे.

काय फायदा : पडीक जमीन सुपीक झाली तर १०.२० कोटींचे उत्पादन वाढेल
सरकारी आकड्यांनुसार भारतात जवळपास १४ अब्ज हेक्टरवर शेती केली जाते. २०१७-१८ मध्ये सुमारे ६८ कोटी टन धान्य- इतर उत्पादन झाले. धान्याचे उत्पादन २८.५० कोटी तर कपाशी, ज्यूट, ऊस यांचे उत्पादन सुमारे ३९ कोटी टन राहिले. त्याचे प्रमाण पाहिल्यास २.१ कोटी हेक्टर पडीक जमीन सुपीक झाल्यास १०.२० कोटी टन उत्पादन वाढेल. उत्पादनाची मोजणी जुले ते जून अशी केली जाते.
 

बातम्या आणखी आहेत...