आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चीनचा सामना करण्याकरिता भारताला युद्धनाैका बांधणी वेग वाढवावा लागणार; नौदलप्रमुख करमबिरसिंग यांचे मत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे - सध्या भारताकडे विमानवाहू ‘आयएनएस-विक्रमादित्य’ एक युद्धनाैका असून २०२१ पर्यंत काेची शिपयार्ड या ठिकाणी बांधणी करण्यात येत असलेली दुसरी युद्धनाैका ‘आयएनएस विक्रांत’ ही भारतीय नाैदलात दाखल हाेईल. भारतीय नाैदलास तीन विमानवाहू युद्धनाैकांची गरज असून पुढील दहा वर्षांत पाच ते सहा युद्धनाैका तयार करण्याचे चीनचे उद्दिष्ट आहे. २०४९ पर्यंत चीन नाैदलाचे दहा युद्धनाैका बांधण्याचे लक्ष्य आहे यामुळे युद्धनाैका बांधणीचा वेग भारताला वाढवावा लागणार असल्याचे मत नाैदलप्रमुख अॅडमिरल करमबीर सिंग यांनी साेमवारी व्यक्त केले. 

पुणे विद्यापीठाच्या संरक्षण आणि सामारिक शास्त्र विभागाच्या वतीने आयाेजित जनरल बी. सी. जाेशी स्मृती व्याख्यानात ‘हिंद महासागरातील बदलती आव्हाने आणि भारताच्या दृष्टीने आवश्यक सागरी सुरक्षा’ या विषयावर ते बाेलत हाेते. या वेळी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डाॅ. नितीन करमळकर, विभागप्रमुख प्रा. डाॅ. विजय खरे उपस्थित हाेते.

अॅडमिरल सिंग म्हणाले, भारताच्या दृष्टीने हिंद महासागरचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.  हिंद महासागरच्या परिसरात जगातील एकूण ३८ देशांचे वास्तव्य असून जगभरातील एकूण ४० टक्के लाेकसंख्या या परिसरात राहत आहे. वेगाने आर्थिक प्रगती करणारे देश या परिसरात आहे. हिंद महासागराच्या माध्यमातून दरराेज ३६ मिलियन बॅरल पेट्राेलियम पदार्थांची वाहतूक केली जात असल्याने व्यापारीदृष्ट्या हा भाग महत्त्वपूर्ण समजला जाताे. भारताचा ९० टक्के आंतरराष्ट्रीय व्यापार आणि ८२ टक्के देशाचे कच्चे तेल समुद्रीमार्गे आयात केले जात आहे. तसेच ५१ टक्के देशांतर्गत कच्च्या तेलाचे उत्पादन देशाच्या विशेष आर्थिक क्षेत्राच्या द्वारे हाेत आहे, असे ते म्हणाले. 
 

जैश-ए-महंमदकडून समुद्रमार्गे हल्ल्याचा धाेका : नाैदलप्रमुख
दहशतवादी संघटना जैश-ए-महंमद त्यांच्या सदस्यांना समुद्रमार्गे भारतावर हल्ले करण्यासाठी प्रशिक्षण देत असल्याची माहिती गुप्तचर विभागाकडून मिळालेली आहे. मात्र, नाैदलाकडून दहशतवाद्यांवर लक्ष ठेवण्यात येत असून काेणत्याही प्रकारचे हल्ले राेखण्यासाठी भारतीय नाैदल सज्ज असल्याचे मत नाैदलप्रमुख अॅडमिरल कर्मबीर सिंग यांनी साेमवारी पत्रकारांशी बाेलताना व्यक्त केले.कर्मबीर सिंग म्हणाले, मुंबईतील २६/११ च्या हल्ल्यानंतर देशाच्या समुद्री सुरक्षेबाबत बरेच बदल झाले असून त्याअनुषंगाने अनेक उपाययाेजना राबवण्यात येत आहे. त्याची जबाबदारी प्रामुख्याने नाैदलावर आहे, असे त्यांनी सांगितले.