आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कसोटी विजयामुळे बॉर्डर-गावसकर चषक 22 वर्षांत नवव्यांदा 'टीम इंडिया'च्या नावे

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मेलबर्न- ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटीत टीम इंडियाने १३७ धावांनी विजय मिळवून चार सामन्यांच्या मालिकेत २-१ अशी निर्णायक आघाडी घेतली. या विजयासह भारतीय संघाने 'बॉर्डर-गावसकर' चषकही पटकावला. 

 

आता सिडनीमध्ये होत असलेल्या चौथ्या कसोटीत ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला तरी मालिकेत दोन्ही संघांची २-२ अशी बरोबरी होईल. या स्थितीत बॉर्डर-गावसकर चषक गतविजेत्या संघाकडेच म्हणजेच भारतीय संघाकडे कायम राहील. सर्वप्रथम १९९६मध्ये बॉर्डर-गावसकर चषक सुरू करण्यात आला. यानंतरच्या काळात या चषकासाठी खेळली गेलेली ही चौदावी कसोटी मालिका आहे. यात भारताने नऊ वेळा हा चषक पटकावला. 


भारत : ४४३/७, १०६/८ ऑस्ट्रेलिया : १५१, २६१

बातम्या आणखी आहेत...