cricket / वेस्ट इंडीजविरोधात भारताचा मालिका विजय

कर्णधार विराट कोहली (५९) आणि रिषभ पंत (६५*) यांची १०६  धावांची भागिदारी 

वृत्तसंस्था

Aug 07,2019 08:43:00 AM IST

गयाना - भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाचा अखेरच्या सामन्यात ७ गडी राखून पराभव करत टी-२० सिरीजमध्ये ३-० ने विजय मिळवला. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा वेस्ट इंडीजच्या विरोधात “क्लीन स्वीप’ केले. मागील वर्षीदेखील भारतीय संघाने वेस्ट इंडीज संघाचा ३-० ने पराभव केला होता. वेस्ट इंडीज संघाने आधी फलंदाजी करत सहा गडी बाद १४६ धावांचे लक्ष्य ठेवले होते. प्रत्युत्तरात खेळताना भारताने १९.१ षटकांत तीन गडी गमावून निर्धारित लक्ष्य पूर्ण केले. विंडीज संघाचा टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांतला ५७ वा पराभव आहे. या पराभवामुळे विंडीज बांगलादेशसह संयुक्त स्वरूपात सर्वाधिक पराभव होणारा संघ ठरला आहे.


वेस्ट इंडीजने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. धवन (३) तिसऱ्या सामन्यातही विशेष कामगिरी करू शकला नाही. २७ धावांवर दोन गडी बाद झाल्यानंतर कर्णधार विराट कोहली (५९) आणि रिषभ पंत (६५*) यांनी तिसऱ्या गड्यासाठी १०६ धावा करत विजयाचा मार्ग सुकर केला. टी-२० स्पर्धेतील कोहलीची २१ वे तर पंतचे दुसरे अर्धशतक आहे.

X
COMMENT