आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारत -विंडीज दुसरा वनडे: काेहलीला 'दसहजारी'ची संधी; भारत खेळणार 950 वा वनडे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

विशाखापट्टणम - यजमान भारतीय संघ अाता क्रिकेटच्या करिअरमध्ये एेतिहासिक कामगिरीची नाेंद करण्यासाठी सज्ज झाला अाहे. टीम इंडिया अाज अापल्या घरच्या मैदानावर करिअरमधील ९५० वा वनडे सामना खेळणार अाहे. हा अाकडा गाठणारा भारत हा जगातील पहिला संघ ठरणार अाहे. भारत अाणि विंडीज यांच्यात अाज बुधवारी मालिकेतील दुसरा वनडे सामना हाेईल.या एेतिहासिक सामन्यात बाजी मारण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. सलामीच्या विजयाने टीम इंडियाचा अात्मविश्वास द्विगुणित झाला अाहे. अाता हीच लय कायम ठेवण्याचा भारताचा प्रयत्न असेल. 

 

दुसरीकडे दीर्घ विश्रांतीनंतर मैदानावर परतलेला कर्णधार विराट काेहलीही अाता विक्रमाच्या उंबरठ्यावर अाहे. त्याला वनडेच्या करिअरमध्ये सर्वात वेगवान दहा हजार धावा पूर्ण करण्याची संधी अाहे. त्यामुळे भारतीय संघाचा हा दुसरा वनडे सामना महत्त्वाचा अाहे. सलामीच्या विजयाने भारताने या घरच्या मैदानावरील पाच वनडे सामन्यांच्या मालिकेमध्ये १-० ने अाघाडी घेतली. अाता कसाेटीपाठाेपाठ वनडे मालिकाही अापल्या नावे करण्याचा यजमानांचा प्रयत्न असेल. 

 

तसेच सलगच्या पराभवाने अडचणीत सापडलेल्या विंडीज संघाची नजर अाता दमदार पुनरागमनाकडे लागली अाहे. मात्र, यासाठी कॅरेबियन टीमला मैदानावर माेठी मेहनत घ्यावी लागेल. 

 

विक्रमासाठी काेहलीला ८१ धावांची गरज 
भारताचा कर्णधार विराट काेहली अाज विक्रमाला गवसणी घालू शकेल. यासाठी त्याला ८१ धावांची अावश्यकता अाहे. यासह ताे वनडे करिअरमध्ये सर्वात वेगवान १० हजार धावा पूर्ण करू शकणार अाहे. त्याच्या नावे २०४ डावांत ९९१९ धावांची नाेंद अाहे. हा पल्ला त्याने ३६ शतके अाणि ४८ अर्धशतकांच्या अाधारे गाठला. अाता ताे ८१ धावांची भर घालून अापल्या नावे वनडेत दहा हजार धावांची नाेंद करेल. यातून त्याला सर्वात वेगवान कामगिरी करताना सचिनलाही मागे टाकण्याची संधी अाहे. सचिनच्या नावे २५९ डावांत १० हजार धावा पूर्ण करण्याचा विक्रम नाेंद अाहे. 

 

भारतीय संघाच्या नावे अाहेत अातापर्यंत ४९० विजय 
भारताने अातापर्यंत ९४९ वनडे खेळले. यामध्ये भारताच्या नावे ४९० विजयाची नाेंद अाहे. यात भारत दुसऱ्या स्थानी अाहे. यामध्ये अाॅस्ट्रेलिया अव्वलस्थानी अाहे. या टीमने करिअरमध्ये ९१६ वनडे सामने खेळताना सर्वाधिक ५५६ विजय संपादन केले अाहेत. या संघांशिवाय काेणत्याही टीमला अद्याप ९०० चा अाकडा पार करता अालेला नाही. पाकच्या नावे ८९९ वनडेची नाेंद अाहे. 

 

घरच्या मैदानावर काेहली गाठणार ४ हजार धावांचा पल्ला 
काेहली वेगवान दहा हजार धावांचा पल्ला गाठताना अजून एक विक्रम अापल्या नावे करू शकेल. त्याला घरच्या मैदानावरील वनडेत ४ हजार धावा पूर्ण करण्याची संधी अाहे. यासाठी त्याला ३० धावांची अावश्यकता अाहे. यासह ताे घरच्या मैदानावर सर्वाधिक धावा काढणारा तिसरा फलंदाज ठरेल. यापूर्वी, सचिन (६९७९ ) व धोनीने (४२१६ ) हाेमग्राउंडवर ४ हजारांपेक्षा अधिक धावा काढल्या अाहेत. 

 

भारताचे २०१७ पासून अाजपर्यत सर्वाधिक विजय 
भारताने सलामीच्या सामन्यात विंडीजवर अाठ गड्यांनी मात केली. यासह टीम इंडियाला अापल्या विजयी माेहिमेला कायम ठेवता अाले. भारताने १ जानेवारी २०१७ पासून अातापर्यंत सर्वाधिक विजयाची नाेंद केली. भारताने यादरम्यान ३३ सामने जिंकले अाहेत. तसेच टीमला १० सामन्यांत पराभवाला सामाेरे जावे लागले. इंग्लंड ३२ विजयासह दुसऱ्या स्थानावर अाहे. 

बातम्या आणखी आहेत...