आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

IND vs NZ: टीम इंडियाचा परदेशात पाचव्यांदा 4-1 ने मालिका विजय; न्यूझीलंडचा 35 धावांनी पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट्स डेस्क - भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्ध शेवटच्या आणि पाचव्या सामन्यात 35 धावांनी विजय मिळवला. यासोबत भारताने न्यूझीलंडविरुद्धची मालिका 4-1 ने काबिज केली आहे. यात युजवेंद्र चहलने 3 आणि मोहम्मद शमीने 2 गडी बाद केले. भारताकडून मॅचमध्ये सर्वाधिक 90 धावा अंबाती रायडूने काढल्या. तसेच ऑलराउंडर विजय शंकर आणि हार्दिक पंड्याने 45-45 धावा जोडल्या. तर एमएस धोनी फक्त एक धाव काढून बाद झाला. भारताने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. तसेच न्यूझीलंडला विजयासाठी 253 धावांचे आव्हान दिले. परंतु, किवींचा संघ अवघ्या 217 धावांवरच सर्वबाद झाला.

 

जाधवच्या 1000 धावा पूर्ण
केदार जाधवने या मॅचसह आपल्या वनडे करिअरमध्ये 1000 धावांचे लक्ष्य पूर्ण केले आहे. जाधवने वनडे करिअरमध्ये आतापर्यंत 54 सामने खेळले. त्यामध्ये एकूणच 1002 धावा काढल्या आहेत. यात जाधवच्या दोन शतकांचा देखील समावेश आहे.


अशा होत्या टीम
भारत:
रोहित शर्मा (कॅप्टन), एमएस धोनी, शिखर धवन, शुभमन गिल, अंबाती रायडू, केदार जाधव, दिनेश कार्तिक (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, युजवेंद्र चहल आणि खलील अहमद.

न्यूझीलंड: केन विल्यमसन (कॅप्टन), मार्टिन गुप्टिल, रॉस टेलर, टॉम लाथम (विकेटकीपर), हेनरी निकोलस, जेम्स नीशम, मिशेल सॅन्टनर, टोड एस्टल, कोलिन डी ग्रांडहोम, मॅट हेनरी, ट्रेन्ट बोल्ट

 

बातम्या आणखी आहेत...