Home | Sports | Other Sports | India wins after 20 year in canada, enter in Quarter-final

भारताने 20 वर्षांनी वर्षांनी कॅनडाला हरवले; क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश

बी.जी. जोशी | Update - Dec 09, 2018, 08:01 AM IST

भारतीय हॉकी संघाने अखेरच्या साखळी सामन्यात कॅनडाला 5-1 ने पराभूत केले

 • India wins after 20 year in canada, enter in Quarter-final

  भुवनेश्वर- भारतीय हॉकी संघाने विश्वचषकात क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. टीमने अखेरच्या साखळी सामन्यात कॅनडाला ५-१ ने पराभूत केले. तिसऱ्या सत्रापर्यंत सामना १-१ ने बरोबरीत होता. चौथ्या आणि अखेरच्या सत्रात भारतीय संघाने ४ गोल करत सामना ५-१ ने जिंकला. क गटातील सामन्यात बेल्जियमने दक्षिण आफ्रिकेला ५-१ ने हरवले.

  भारतीय संघाने साखळीत दोन विजय मिळवले. बेल्जियमविरुद्ध सामना बरोबरीत राहिला. टीम सात गुणांसह गटात अव्वलस्थानी आहे. भारतीय संघाने २० वर्षांनी कॅनडाला विश्वचषकात पराभूत केले. स्पर्धेत आपले आठ वर्षांतील सर्वात चांगले प्रदर्शन आहे. २०१४ मध्ये टीम नवव्या स्थानी होती. बेल्जियम आणि कॅनडा यांच्यात आता विरुद्ध सामने होतील.

  सामन्याच्या १२ व्या मिनिटाला हरमनप्रीतने गोल करत आघाडी मिळवली. दोन सत्रात हाच फरक राहिला. सामन्यात ३९ व्या मिनिटाला फ्लोरिसने गोल करत १-१ ने बरोबरी साधली. ४६ व्या मिनिटाला चिंगलेनसाना, ४७ व ५७ व्या मिनिटाला ललित उपाध्याय आणि ५१ व्या मिनिटाला अमित रोहिदासने गोल करत ५-१ ने विजय मिळवला.

  ३६ वर्षांनी सामन्यात ५ गोल
  भारताने चालू असलेल्या विश्वचषकात पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५-० ने विजय मिळवला होता. कॅनडाविरुद्ध ५-१ ने बाजी मारली. ३६ वर्षांनंतर टीमने इंडियाने एकाच विश्वचषकात दाेन सामन्यांत पाच गोल केले. यापूर्वी १९८२ मध्ये अशी कामगिरी केली होती. एकूण विश्वचषकात आठ वेळा पाच किंवा त्यापेक्षा अधिक गोल केले.

Trending