आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • India Wins: India Vs Bangladesh (IND Vs BAN) Indore 1st Test Day 3 Live Cricket Score Updates

इंदूर कसोटीत टीम इंडियाचा दणदणीत विजय, पहिल्या सामन्यात बांग्लादेशचा 130 धावांनी केला पराभव

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • टीम इंडियाची टेस्ट मालिकेत बांग्लादेश संघावर 1-0 ची आघाडी
  • आयसीसी रँकिंगमध्ये 300 पॉइंट्ससह टीम इंडिया नंबर एक

स्पोर्ट्स डेस्क - भारताने बांग्लादेशला इंदूर टेस्ट सामन्यात शनिवारी एक डाव आणि 130 धावांनी पराभूत केले आहे. यासोबतच टीम इंडियाने 2 सिरीजच्या या सामन्यात 1-0 अशी आघाडी घेतली. उल्लेखनीय बाब म्हणजे, भारतीय संघाचा हा सलग सहावा विजय आहे. यापूर्वी ऑस्ट्रेलियाविरुद्ध डिसेंबरमध्ये पर्थच्या मैदानावर भारताने पराभवाचा सामना केला होता. सलग 6 सामने जिंकून भारताने आयसीसी चॅम्पियनशिपमध्ये 300 पॉइंट्ससोबत सर्वोच्च स्थान मिळवले आहे. या सामन्यात भारताने 6 विकेट गमवून 493 धावांवर पहिली इनिंग घोषित केली होती. तर बांग्लादेशची टीम पहिल्या इनिंगमध्ये 150 आणि दुसऱ्या इनिंगमध्ये 213 करत ऑलआउट झाली.


मयंक अग्रवालने 243 धावांची खेळी करताना करिअरच्या आठव्या टेस्टमध्येच दुसरे दुहेरी शतक ठोकले आहे. यासोबतच अजिंक्य रहाणे 86, चेतेश्वर पुजाराने 54 आणि रविंद्र जडेजाने नाबाद 60 धावा काढल्या. बांग्लादेशकडून सर्वाधिक 4 विकेट अबु झायेदने घेतल्या. भारतासाठी दोन्ही इनिंग्समध्ये मोहंमद शमीने 7, रविचंद्रन अश्विनने 5, उमेश यादवने 4 आणि ईशांत शर्माने 3 विकेट घेतल्या. बांग्लादेशसाठी मुशाफिकुर रहीमने 43 आणि 64 (पहिल्या-दुसऱ्या इनिंगमध्ये) आणि लिटन दासने 21-35 धावा काढल्या आहेत.

बातम्या आणखी आहेत...