Home | Sports | Other Sports | India wins the third Test match against England by 203 runs

तिसरी कसोटी : ट्रेंट ब्रिजवर भारत 59 वर्षांनी विजयी, इंग्लंडला 203 धावांनी केले पराभूत

दिव्य मराठी वेब टीम | Update - Aug 23, 2018, 01:01 AM IST

भारताने 11 वर्षांनंतर नॉटिंघममध्ये विजय मिळवला आहे. यापूर्वी 2007 मध्ये द्रविडच्या नेतृत्वात 7 विकेटने विजय मिळवला होता.

 • India wins the third Test match against England by 203 runs

  नॉटिंघम - भारताने इंग्लंडवर तिसऱ्या कसोटीत अखेरच्या दिवशी बुधवारी सकाळी २०३ धावांनी मोठा विजय मिळवत पाच सामन्यांच्या मालिकेत विजयाचे अंतर १-२ ने असे केले. भारताने नॉटिंघमच्या ट्रेंट ब्रिज मैदानावर तब्बल ५९ वर्षांनी दुसरा विजय मिळवला. भारताच्या विजयात पाच विकेट घेणाऱ्या वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचे योगदान महत्त्वाचे ठरले.


  भारताने इंग्लंडसमोर ५२१ धावांचे लक्ष्य ठेवले. इंग्लंडने चौथ्या दिवसअखेर ९ बाद ३११ धावा केल्या. भारताचा विजय एक दिवस लांबणीवर पडला. त्यानंतर अखेरच्या दिवशी सकाळच्या सत्रात रविचंद्रन अश्विनने अखेरची विकेट जेम्स अँडरसनला ११ धावांवर बाद करत १०.५ षटकांत इंग्लंडचा डाव ३१७ धावांवर संपुष्टात आणला. इंग्लंड केवळ ६ धावांची भर घालू शकला. भारताला मालिकेतील पहिला विजय मिळवून दिला. भारतीय संघाने पहिल्या डावात ३२९ धावा केल्या. हार्दिक पांड्याने ५ बळी घेत इंग्लंडला पहिल्या डावात १६१ धावांवर रोखले. भारताच्या विराट कोहलीने (१०३) आपले २३ वे शतक झळकावत दुसऱ्या डावात ७ बाद ३५२ धावांवर डाव घोषित केला. इंग्लंडसमोर ५२१ धावांचे लक्ष्य ठेवले. दुसऱ्या डावात चेतेश्वर पुजाराने ७२ आणि हार्दिक पांड्याने नाबाद ५२ धावा काढल्या.


  चौथ्या दिवसअखेर इंग्लंडने ३११ धावांवर ९ गडी गमावले होते. अखेरच्या दिवशी भारताची विजयाची औपचारिकता राहिली होती. अश्विनने तिसऱ्या षटकाच्या पाचव्या चेंडूवर अँडरसनला बाद करत भारताला विजयासह मालिकेत परत आणले. अश्विनच्या उसळत्या चेंडूवर अँडरसनने रहाणेच्या हाती सोपा झेल दिला, आणि इंग्लंड पराभूत झाला. तळातील फलंदाज आदिल राशिद ३३ धावांवर नाबाद राहिला. इंग्लंडसाठी जोस बटलरने सर्वाधिक १०६ धावा केल्या. त्याने २५१ चेंडूंत २१ चौकार लगावले. स्टोक्सने २७५ चेंडूत ६ चौकारांसह ६२ धावा काढल्या. या दोघांनी चौथ्या दिवशी पाचव्या गड्यासाठी १६९ धावांची भागीदारीने संघाचा विजय लांबवला होता.


  11 वर्षांनंतर मिळाला विजय
  भारताने 11 वर्षांनंतर नॉटिंघममध्ये विजय मिळवला आहे. यापूर्वी 2007 मध्ये द्रविडच्या नेतृत्वात 7 विकेटने विजय मिळवला होता. त्यानंतर 2011 मध्ये महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वात भारताचा येथे पराभव झाला होता. तर 214 मध्ये येथील सामना अनिर्णित सुटला होता.

  विराट म्हणाला-विजयाची गरज होती
  भारतीय कर्णधार विराट कोहली मॅन ऑफ द मॅच ठरला. त्याने विजय केरळच्या पूरग्रस्तांना अर्पण केला. मालिकेच्या या टप्प्यावर हा विजय गरजेचा होता असे विराट म्हणाला. लॉर्ड्सच्या पराभवानंतर आम्ही फलंदाजी आणि गोलंदांनी एकत्रितपणे चांगली कामगिरी केली. गोलंदाजांनी 20 विकेट घेण्याची तयारी दाखवली. तर फलंदाजांनीही चांगल्या धावा केल्या. आम्ही चांगल्या कॅचेसही घेतल्या. मॅन ऑफ द मॅच अवॉर्ड त्याने पत्नी अनुष्काला समर्पत केला.

  धावांचा विचार करता भारताचा तिसरा मोठा विजय

  वर्ष ठिकाण विजयातील फरक
  1986 लीड्स, इंग्लंड 279
  2016 विशाखापट्टनम, भारत 246
  2018 नॉटिंघम, इंग्लंड 203
  1962 कोलकाता, भारत 187

  इंग्लंड दुसरी इनिंग

  फलंदाज रन बॉल 4s 6s
  अॅलिस्टर कूक झेल राहुल बो. इशांत 17 39 2 0
  किटोन जेनिंग्स झेल पंत बो. इशांत 13 31 2 0
  जो रूट झेल राहुल बो. बुमराह 13 40 2 0
  ओली पोप झेल कोहली बो. शमी 16 39 3 0
  बेन स्टोक्स झेल राहुल बो. हार्दिक 62 187 6 0
  जोस बटलर एलबीडबल्यू बो. बुमराह 106 176 21 0
  जॉनी बेयरस्टो बो. बुमराह 0 1 0 0
  क्रिस वोक्स झेल पंत बो. बुमराह 4 3 1 0
  आदिश रशीद नॉट आउट 33 64 5 1
  स्टुअर्ट ब्रॉडझेल राहुल बो. बुमराह 20 29 3 0
  जेम्स एंडरसन झेल रहाणे बो. अश्विन 11 24 1 0

  रन: 317/10, ओव्हर: 104.5, एक्स्ट्रा: 22.

  विकेट्स: 27/1, 32/2, 62/3, 62/4, 231/5, 231/6, 241/7, 241/8, 291/9, 317.

  गोलंदाजी : जसप्रित बुमराह: 29-8-85-5, इशांत शर्मा: 20-4-70-2, रविचंद्रन अश्विन: 22.5-8-44-1, मोहम्मद शमी: 19-3-78-1, हार्दिक पंड्या: 14-4-22-1.

  भारत दुसरी इनिंग

  फलंदाज रन बॉल 4s 6s
  शिखर धवन स्टं. बेयरस्टो बो. रशीद 44 63 6 0
  लोकेश राहुल बो. एलबीडबल्यू वोक्स 36 33 7 0
  चेतेश्वर पुजारा झेल कुक बो. स्टोक्स 72 208 9 0
  विराट कोहली एलबीडबल्यू बो. वोक्स 103 197 10 0
  अजिंक्य रहाणे बो. रशीद 29 94 3 0
  ऋषभ पंत झेल कुक बो. एंडरसन 1 6 0 0
  हार्दिक पंड्या नॉट आउट 52 52 7 1

  मोहम्मद शमी झेल कुक बो. रशीद

  3 6 0 0
  रविचंद्रन अश्विन नॉट आउट 1 1 0 0

  रन: 352/7, ओव्हर: 110, एक्स्ट्रा: 11

  विकेट्स: 60/1, 111/2, 224/3, 281/4, 282/5, 329/6, 349/7.

  गोलंदाजी: जेम्स एंडरसन: 22-7-55-1, स्टुअर्ट ब्रॉड: 16-3-60-0, क्रिस वोक्स: 22-4-49-1, बेन स्टोक्स: 20-3-68-2, आदिल रशीद: 27-2-101-3, जो रूट: 3-0-9-0.

  कोहली दुसरा यशस्वी कर्णधार; मानधन पुरग्रस्ताना
  विराट कोहलीने आपल्या नेतृत्वाखाली कसोटीमध्ये २२ वा विजय मिळवत दुसरा यशस्वी कसोटी कर्णधार बनला. त्याने माजी भारतीय कर्णधार सौरभ गांगुलीचा २१ कसोटी विजयाचा विक्रम मागे टाकला.कसोटीत महेंद्रसिंग धोनी सर्वात यशस्वी कर्णधार आहे. त्याने ६० कसोटींत नेतृत्व करत भारताला २७ विजय मिळवून दिले आहेत. कर्णधार कोहली व संघ सहकाऱ्यांनी सामना जिंंकल्यानंतर आपल्या सामन्याचे मानधन केरळमधील पुरग्रस्तांना देण्याचे जाहीर केले.


 • India wins the third Test match against England by 203 runs
 • India wins the third Test match against England by 203 runs

Trending