Home | Sports | From The Field | India won 2-2 gold medals in Shooting-wrestling

नेमबाजी-कुस्तीत जिंकली 2-2 सुवर्णपदके; वुशूत पहिल्यांदा एकाच खेळात 4 पदके

वृत्तसंस्था | Update - Aug 23, 2018, 12:52 AM IST

भारतीय खेळाडूंनी पहिल्या चार दिवसांत ४ खेळांमध्ये २०१४ इंचियोन आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाला मागे सोडले आहे.

 • India won 2-2 gold medals in Shooting-wrestling
  महिला मल्लांनी जिंकली दोन पदके

  जकार्ता - भारतीय खेळाडूंनी पहिल्या चार दिवसांत ४ खेळांमध्ये २०१४ इंचियोन आशियाई स्पर्धेतील प्रदर्शनाला मागे सोडले आहे. नेमबाजी आणि कुस्तीमध्ये खेळाडूंनी आतापर्यंत प्रत्येकी २ सुवर्णपदके पटकावली. पहिल्यांदा वुशूच्या खेळाडूंनी एका खेळात मंगळवारी चार पदके पक्की केली होती आणि बुधवारी ते मिळवली देखील. सेपक टकरामध्ये भारतीय टीमने आतापर्यंतचे पहिले पदक जिंकले आहे. खेळाडू गत वेळेच्या एकूण प्रदर्शनाला मागे सोडतील, अशी आशा आहे. इंचियोनमध्ये भारताने ११ सुवर्णांसह ५७ पदके जिंकली होती.

  खेलो इंडियातील साैरभला सुवर्णपदक

  नेमबाजीत १० मी. एअर पिस्तूलमध्ये १६ वर्षीय सौरभ चौधरीने सुवर्ण जिंकले. पहिल्या खेलो इंडियामध्ये निवड झालेल्या खेळाडूंच्या यादीत सौरभचा समावेश आहे. राही सरनौबतने करत २५ मी. पिस्तूल प्रकारात सुवर्ण जिंकून दिले. दीपक कुमारने १० मी. एअर रायफल, संजीव राजपूतने ५० मीटर ३ पोझिशन व लक्ष्यने ट्रॅपमध्ये रौप्य मिळवले. अभिषेकने १० मीटर एअर पिस्तूल प्रकारात कांस्य, मिश्र दुहेरीत रवी कुमार व अपूर्वी चंदेलनेने कांस्यने जिंकले.

  महिला मल्लांनी जिंकली दोन पदके

  कुस्तीमध्ये युवा मल्ल बजरंग पुनियाने ६५ किलो वजनी गटात शानदार प्रदर्शन करत देशासाठी सुवर्णपदक जिंकले. फायनलपर्यंत चार सामन्यांत बजरंगने एकूण १५ गुण मिळवले, विरोधी खेळाडू केवळ ३ गुण मिळवू शकला. महिला गटात ५० किलो गटात विनेश फोगाटने सुवर्ण मिळवले. खेळाडूंनी सलग दोन आशियाई पदके जिंकली. त्यानंतर दिव्या काकरानने ६८ किलो गटात कांस्यपदक जिंकून देशाला तिसरे पदक दिले.

  गत स्पर्धेपेक्षा डबल पदके

  वुशूमध्ये आपले चार खेळाडू विविध गटांत उपांत्य फेरीत पोहोचले आहेत. या खेळात उपांत्य फेरीत पराभूत झालेल्या खेळाडूंनादेखील कांस्यपदक मिळते. त्यामुळे आपली चार पदके पक्की झाली आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत डबल पदके मिळतील. वुशूचा १९९० मध्ये आशियाई स्पर्धेत समावेश करण्यात आला. मार्शल आर्टच्या या खेळात चीनच्या खेळाडूंचा दबदबा आहे. चीनने एकट्याने सर्वाधिक ५० पदके जिंकली आहेत.

  १२ वर्षांत पहिल्यांदा पदक

  सेपक टकरामध्ये भारतीय पुरुष संघाने कांस्यपदक जिंकले. या खेळाला १९९० मध्ये आशियाई स्पर्धेत समाविष्ट केले. भारतीय टीम २००६ पासून या खेळात सहभागी होत आहे. टीमने ३ सामन्यांत केवळ एक विजय मिळवला, दोन सामन्यांत पराभवाचा सामना करावा लागला. १२ सदस्यीय भारतीय टीममध्ये ८ खेळाडू मणिपूरचे आहेत. टीमला स्पर्धेसाठी पाठवण्यासाठी अडचणींचा सामना करावा लागला. अनेक तज्ज्ञ पदकाची आशा नसल्याने टीमला इंडोनेशियामध्ये पाठवण्यास इच्छुक नव्हते.

 • India won 2-2 gold medals in Shooting-wrestling
  नेमबाजी
 • India won 2-2 gold medals in Shooting-wrestling
  वुशू

Trending