आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा बांग्लादेशवर डे-नाइट कसोटीसह मालिका विजय; एक डाव आणि 46 धावांनी उडवला धुव्वा  

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

स्पोर्ट डेस्क - भारताने ईडन गार्डन्सवर खेळल्या गेलेल्या डे-नाइट कसोटी सामन्यात बांग्लादेशचा एक डाव आणि 46 धावांनी पराभव केला. भारताने दोन कसोटी सामन्यांच्या मालिकते 2-0 ने धूळ चारली. उमेश यादव 5 आणि इशांत शर्माने 4 गडी बाद केले. बांग्लादेशकडून मुश्फिकुर रहीम यांनी 74 धावा केल्या. भारतीय संघाने आपला पहिला डाव 9 बाद 347 धावांवर घोषित केला होता. बांग्लादेशचा संघ पहिला डाव 106 आणि दुसरा डाव 195 धावांवर आटोपला.  यापूर्वी भारताने पहिल्या कसोटी सामन्यात बांग्लादेशचा एक डाव आणि 130 धावांनी पराभव केला होता. इशांत शर्माने सामन्यात 9 गडी बाद केले. त्याने बांग्लादेशच्या दुसऱ्या डावात शादमान इस्लाम (0), इमरुल कायेस (5), मोमिनुल हक (0) आणि मेहदी हसन (15) यांना तंबूत पाठवले. दुखापतीमुळे महमूदुल्ला 39 धावा करून रिटायर्ड हर्ट झाला. तर बांग्लादेशसाठी अल अमीन हुसैन आणि इबादत हुसैन यांनी प्रत्येकी 3-3 गडी बाद केले. तर अबु जायेदला एक बळी मिळवता आला. भारतीय कर्णधार विराट कोहलीने 136 धावा करत कसोटी कारकिर्दीतील 27 वे आणि डे-नाइट कसोटी सामन्यातील पहिले शतक झळकावले.