आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • India Won Test Series First Time In Australia In 71 Years

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारताचा ऑस्ट्रेलियातील पहिला कसोटी मालिका विजय, 71 वर्षांनंतर यश, सिडनी कसोटी मात्र ड्रॉ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिडनी - भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानची सिडनी येथील चौथी कसोटी ड्रॉ झाली आहे. त्यामुळे चार सामन्यांच्या मालिकेत भारताने 2-1 ने ऐतिहासिक विजय मिळवला आहे. दोन्ही देशांदरम्यानच्यास 71 वर्षांच्या क्रिकेट इतिहासात ऑस्ट्रेलियात भारताने प्रथमच कसोटी मालिका विजय मिळवला आहे. भारत ऑस्ट्रेलियात मालिका जिंकणारा जगातील पाचवा आणि आशियातील पहिला संघ आहे. यापूर्वी इंग्लंड, वेस्ट इंडिज, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंडने ऑस्ट्रेलियात मालिका जिंकली आहे. 


दरम्यानस पावसामुळे मालिकेतील चौथ्या आणि अखेरच्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला. कमी प्रकाश आणि पावसामुळे चौथ्या दिवशीही फक्त 64.4 ओव्हरचा खेळ झाला होता. तर तिसऱ्या दिवशीही 17 ओव्हरचा खेळ कमी झाला होता. 

 
1947 पासून ऑस्ट्रेलात मालिका खेळतोय भारत 
टीम इंडियाने ऑस्ट्रेलियामध्ये 1947 मध्ये पहिली कसोटी मालिका खेळली होती. तेव्हापासून आतापर्यंत भारताने ऑस्ट्रेलियात 12 कसोटी मालिका खेळल्या. त्यातील हा पहिलाच मालिका विजय आहे. भारताने ऑस्ट्रेलियात 8 मालिका गमावल्या आहेत. तर तीन वेळा मालिका ड्रॉ झाल्या आहेत. ऑस्ट्रेलियामध्ये भारताने दुसऱ्यांदा दोन कसोटी जिंकल्या आहेत. यापूर्वी 1977/78 मध्ये पाच सामन्यांच्या मालिकेत भारताने दोन कसोटी जिंकल्या होत्या. पण त्यावेळी ऑस्ट्रेलियाने तीन कसोटी जिंकून मालिका जिंकली होती. 

 
विदेशात 19वा कसोटी मालिका विजय 
भारतीय संघाने विदेशात आतापर्यंत 82 कसोटी मालिका खेळल्या आहेत. त्यापैकी फक्त 19 मालिका जिंकण्यात भारताला यश मिळालेले आहे. तर 15 मालिका ड्रॉ राहिल्या आहेत. 48 मालिकांत भारताचा पराभव झाला आहे.