आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकोलकाता - गुलाबी चेंडूवर खेळलेल्या आपल्या पहिल्या कसोटीत भारताने बांगलादेशला डाव व ४६ धावांनी हरवले. भारताने दोन सामन्यांची मालिका देखील २-० ने जिंकली. भारत सलग चार सामने डावाने जिंकणारा जगातील दुसरा देश बनला. यापूर्वी, त्याने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन कसोटी डावाने जिंकल्या होत्या. विराटच्या नेतृत्वात भारताने ११ व्या वेळी डावाने बाजी मारली. भारताने सलग पाचवी कसोटी मालिकादेखील जिंकली. यात देशात ३ आणि विदेशात २ कसोटी मालिका विजय आहे. बांगलादेशने सामन्याच्या दुसऱ्या दिवशी १५२ धावांवर ६ गडी गमावले होते. भारताला विजयासाठी केवळ ४ बळींची गरज होती. बांगलादेशचा डाव १९५ वर संपला व तोही ४८ मिनिटांत. काल रिटायर्ड झालेला महमूदुल्लाह पुन्हा फलंदाजीसाठी आला नाही. हा दिवस-रात्र कसोटी इतिहासातील दुसरा सर्वात छोटा सामना ठरला, जो केवळ २ दिवस ४८ मिनिटे चालला. यापूर्वी डिसेंबर २०१७ मध्ये द. आफ्रिकेने झिम्बाब्वेला २ दिवसांत हरवले होते.
हा भारताचा जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमध्ये सातवा सामना ठरला. त्यांनी सर्व सात सामने जिंकले. टीम इंडियाने घरच्या मैदानावर सलग १२ वी मालिका जिंकली. भारताने सलग तिसऱ्या मालिकेत क्लीन स्वीप केले. यापूर्वी, दक्षिण आफ्रिकेला ३-० ने आणि वेस्ट इंडिजला २-० ने हरवले. सामन्यात ९ बळी घेणारा इशांत शर्मा सामनावीर आणि मालिकावीर ठरला. आता टीम इंडिया घरच्या मैदानावर फेब्रुवारी २०२० मध्ये खेळणार आहे. तेव्हा इंग्लंड टीम ५ कसोटीसाठी भारत दौऱ्यावर येणार आहे. पुढील वर्षी भारत ऑस्ट्रेलिया व न्यूझीलंडचा दौरा करणार आहे.
कसोटीत दुसऱ्यांदा सर्व बळी वेगवान गोलंदाजांनी घेतले
भारतीय वेगवान गोलंदाजांनी लढतीत १९ बळी घेतले. महमुदुल्ला रिटायर्ड झाला. कसोटीत दुसऱ्यांदा आपल्या वेगवान गोलंदाजांनी सर्व बळी घेतले. यापूर्वी २०१८ मध्ये द. आफ्रिकेविरुद्ध २० बळी घेतले होते. घरच्या मैदानावर पहिल्यांदा सर्व गडी बाद झाले, कोणत्याही फिरकीपटूला बळी मिळाला नाही.
सर्व १२ दिवस-रात्र लढतीचा निकाल लागला
> एक लढतीचा दुसरा दिवस
> 3 लढतीचा तिसऱ्या दिवशी
> 2 लढतीचा चौथ्या दिवशी
> 6 लढतीचा पाचव्या दिवशी
कोहली म्हणाला- दादाने संघाला आक्रमकता शिकवली
आपली गोलंदाजी सध्या जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ आहे. आपले गोलंदाज खूप आक्रमक झाले आहेत. हे गेल्या ३-४ वर्षांच्या कठीण मेहनतीचे फळ आहे. आक्रमक खेळायला सुरुवात गांगुलीच्या काळात झाली. दादाच्या संघाने ही सुरुवात केली. आम्ही त्याला पुढे नेत आहोत. आता वेगवान गोलंदाज निर्भीड झाले, ते कोणत्याही फलंदाजाचा सामना करतात. वेस्ट इंडीयाच्या १९७० च्या वेळेच्या टीमसोबत भारताची तुलना योग्य नाही.
कोहलीने धोनीचा विक्रम तोडला :
हा भारताचा कसोटीत सलग सातवा विजय आहे. त्यासह कोहलीने कसोटीत सलग सर्वाधिक सामने जिंकण्याच्या बाबतीत धोनीचा विक्रम मोडला. धोनीने २०१३ मध्ये फेब्रुवारी ते नोव्हेंबरदरम्यान सलग सहा सामने जिंकले होते.
इतर चांगले ठिकाण आहे, गुलाबी चेंडूवरील कसोटी दुसऱ्या शहरात झाल्या पाहिजेत : गांगुली
ईडन गार्डनवर गुलाबी चेंडूवरील कसोटी यशस्वी ठरली. मी खूप आनंदी आहे. आम्ही हे सगळे कसोटी क्रिकेटला प्रोत्साहन देण्यासाठी केले. नेहमी कसोटी पाहण्यासाठी काही हजार प्रेक्षक येतात. मात्र हा सामना पाहण्यासाठी ५५-६० हजार चाहते आले . मात्र, दिवस-रात्र सामना नेहमीच ईडन गार्डनवर नको. देशात इतर चांगले स्टेडियम आहे, जेथे हा सामना खेळवता येऊ शकतो. त्यामुळे कसोटीची लोकप्रियता वाढेल. -सौरव गांगुली, बीसीसीआय अध्यक्ष
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.