आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Actress Gives An Epic Reply To A Billionaire Who Asked For A One Night Stand

दुबईतल्या अब्जाधीशाने या इंडियन अॅक्ट्रेसला दिली One Night Stand ची ऑफर; म्हणाली, याला धडा शिकवणारच!

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - मल्ल्याळम अभिनेत्री नेहा सक्सेनाने दुबईतील एका अब्जाधीशाला सोशल मीडियावर त्याची ऐफत दाखवली. तिने या अब्जाधीशाचे आणि आपल्या पीआरचे झालेले व्हॉट्सअॅप संभाषण सोशल मीडियावर पोस्ट केले. दुबईत राहणाऱ्या त्या व्यक्तीने अॅक्ट्रेसला आपल्यासोबत एक रात्र घालवण्याची ऑफर दिली. त्यावर संतप्त नेहाने तो चॅट जशास तसा पोस्ट करून त्या व्यक्तीची तुलना कुत्र्यासोबत केली. नेहाच्या पीआरला अब्जाधीशाने थेट प्रश्न विचारला, की "ही अभिनेत्री दुबईत माझ्यासोबत एक रात्र घालवण्यासाठी उपलब्ध होईल का?" अवघ्या काही सेकंदांत उत्तर देऊन तुला माध्यमांसमोर उघडे पाडणार असे सांगितले. 


या कुत्र्याला धडा शिकवणारच..!
> दुबईत वन नाइट स्टँडची ऑफर देणाऱ्या या अब्जाधीशाला नेहाने माध्यमांसमोर उघडे पाडले. ज्या पद्धतीने तो महिलांबद्दल बोलतो त्यासाठी याला प्रसिद्धी मिळायलाच हवी. असे बोलताना, अॅक्ट्रेस नेहाने या चॅटचा स्क्रीनशॉट फेसबूकवर पोस्ट केला. तसेच या कुत्र्याला आपण धडा शिकवणारच असे म्हटले आहे. तिने त्या व्यक्तीचा मोबाईल नंबर सुद्धा दिला आणि लोकांना त्या आधारे याची ओळख पटवण्यात मदत करण्याचे आवाहन केले. 
> ती व्यक्ती संयुक्त अरब अमिरातची नागरिक निघाली. विविध ठिकाणी काम करणाऱ्या महिलांना अशा वृत्तीचे लोक भेटतात. परंतु, बऱ्याचवेळा लोक समोर येऊन त्यांचा भंडाफोड करत नाहीत. सेलिब्रिटी किंवा अभिनेत्रीसह आपण एक महिला आहोत आणि अशा लोकांच्या विरोधात आवाज उठवायलाच हवी. अशा कुत्र्यांना समाजातून बहिष्कृत करायला हवे असेही तिने लिहिले. नेहा सक्सेना मल्ल्याळम चित्रपटातील सर्वात लोकप्रीय चेहऱ्यांपैकी एक आहे. तिचा कसाबा हा चित्रपट प्रचंड गाजला होता.

बातम्या आणखी आहेत...