आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करानवी दिल्ली- भारतीय वायुसेनेना सात दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एएन-32 विमानबद्दल माहिती देणाऱ्याला 5 लाख रूपयांचे बक्षिस देण्याचे जाहीर केले आहे. शनिवारी पूर्व एअर कमांडचे एअर मार्शल आर.डी. माथुर यांना या गोष्टीची घोषणा केली आहे. एएन-32 ने 3 जूनला असमच्या जोरहाट एअरबेसवरून उडाण घेतली होती. त्यानंतर अरुणाचलच्या मेनचुका एअर फील्डवरून उडत असताना विमानाचा संपर्क तुटला होता, हा परिसर चीनच्या जवळील आहे. विमानात 5 क्रु मेंबर आणि 8 प्रवासी होते.
वायुसेनेने विमानासची माहिती देण्यासाठी वायुसेनेच्या विभागाचे फोन नंबर (0378-3222164, 9436499477, 9402077267, 9402132477) देखील दिले आहेत. त्यांनी सांगितले की, खराब हवामान असूनही लष्कर, वायुसेना, ग्राउंड फोर्स, सी-130जे, हेलिकॉप्टर, आणि नौसेनेचे पी-8आय तपास करत आहेत. सियांग जिल्ह्यातील अंदाजे 2500 वर्ग किलोमीटर क्षेत्राची तपासाणी झाली आहे.
उपग्रहांच्या मदतीने विमानाचा शोध
वायुसेनेने सांगितले की, जमिनीवर तपास करत असलेल्या टीमकडून क्रॅश क्रॅश होऊ शकत असलेल्या जागांबद्दल काही माहिती हाती लागली आहे, त्यामुले हेलिकॉप्टर संबंधित लोकेशेनवर पाठवले पण विमानाचे अवशेष सापडले नाहीत. वायुसेनेच्या सुत्रांनी सांगितले की, इस्रोच्या सॅटेलाइटच्या मदतीने विमानाचा शोध सुरू आहे. त्या उपग्रहांकडून अरुणाचल आणि असमच्या काही भागांवर निगराणी ठेवण्यात येत आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.