आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हवाई दलाला मिळाले 4 चिनूक हेलिकॉप्टर; यांनीच केली होती ओसामा बिन लादेनविरुद्ध कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

चंदीगड - अमेरिकेकडून विकत घेतलेल्या अत्याधुनिक चिनूक हेलिकॉप्टर्सचा पहिला ताफा भारतीय हवाई दलात सामिल झाला आहे. चंदीगड येथे पार पडलेल्या समारंभात 4 चिनूक अधिकृतरित्या भारतीय हवाई दलात समाविष्ट करण्यात आले. एअर चीफ मार्शल बीएस धनोआ म्हणाले, देशासमोर सुरक्षेसाठी मोठी आव्हाने आहेत. अशात चिनूक हेलिकॉप्टर्सची खूप गरज होती. दुरस्थ आणि उंच ठिकाणी अवजड लष्करी साहित्य घेऊन जाण्यासाठी चिनूक एक उत्कृष्ट हेलिकॉप्टर आहे. अशाच पद्धतीने ज्या दिवशी भारतीय हवाई दलात रफाल समाविष्ट होतील, तेव्हापासून पाकिस्तान भारतालगतच्या सीमेवर फटकणार सुद्धा नाही असेही ते पुढे म्हणाले आहेत.


17 हजार कोटींमध्ये झाली होती डील
गुजरातच्या कच्छ विमानतळावर चारही चिनूक हेलिकॉप्टर रविवारीच दाखल झाले होते. भारताने 2015 मध्ये अमेरिकन विमान कंपनी बोइंगसोबत 15 चिनूक हेलिकॉप्टर खरेदी करण्याचा करार केला होता. यासाठी 2.5 अब्ज अमेरिकन डॉलर अर्थात जवळपास 17 हजार कोटींचा सौदा झाला होता. यात 22 अपाचे लढाऊ हेलिकॉप्टरचा सुद्धा समावेश आहे. अमेरिकेतील फिलाडेल्फिया येथील बोइंग कंपनीने गेल्या आठवड्यातच भारताला हे हेलिकॉप्टर सोपविले होते. करारानुसार, उर्वरीत चिनूक आणि सर्वच अपाचे हेलिकॉप्टर भारताला याच वर्षाच्या शेवटी मिळणार आहेत.


अपाचे सर्वोत्कृष्ठ गनशिप...
बोइंग कंपनीने सांगितल्याप्रमाणे, अपाचे जगातील सर्वोत्कृष्ठ लढाऊ हेलिकॉप्टर आहे. अमेरिकन लष्करात गेल्या अनेक वर्षांपासून अपाचे आणि चिनूक यांचा वापर केला जातो. 2011 मध्ये पाकिस्तानच्या अबोटाबाद येथे ओसामा बिन लादेनवर अमेरिकेच्या नेव्ही सील कमांडोंनी कारवाई केली होती. त्यावेळी याच चिनूक हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला होता. बोइंगने 2018 मध्येच भारतीय अभियंते आणि लढाऊ वैमानिकांनी चिनूक आणि अपाचे हेलिकॉप्टरची ट्रेनिंग दिली होती. भारत अपाचे वापरणारा 14 आणि चिनूक वापरणारा 19 वा देश ठरला आहे.

बातम्या आणखी आहेत...