आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

IAF Operation Live : PoK मध्ये एअरस्ट्राईक : भारतच्या ऑपरेशनचे 4 पुरावे, 19 मिनिटात लष्कर-जैश आणि हिजबुलचे कॅम्प नष्ट

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

भारतीय वायुसेनेने पुलवामा हल्ल्याचे उत्तर पाकिस्तानला दिले आहे. वायुसेनेच्या मिराज-2000 विमानांनी मंगळवारी पहाटे 3.30 वाजता एलओसी पार करत पीओकेमध्ये मोठी कारवाईत करून जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी तळ नष्ट केले आहेत. या हल्ल्याचे व्हिडीओ आणि फोटो पीओकेमधून समोर आले आहेत. पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाने हे सर्व फोटो जारी केले असून सांगितले आहे की, भारतीय विमानांनी मोकळ्या मैदानात बॉम्ब हल्ला केला. पहाटेच्या या हल्ल्यातील व्हिडिओमध्ये वायुसेनेचे विमान बॉम्ब हल्ला करताना दिसत आहेत.


सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुझफ्फराबाद, चकोटी आणि बालाकोट येथे लष्कर, जैश आणि हिजबुलचे कॅम्प नष्ट केले. हे संपूर्ण ऑपरेशन केवळ 19 मिनिटात पूर्ण करण्यात आले. भारतीय वायुसेनेने या ऑपरेशनसाठी 10 पेक्षा जास्त मिराज विमानांचा वापर केला. भारतीय वायुसेनेच्या एअरस्ट्राईकची पाकिस्ताननेसुद्धा पुष्टी केली असून हल्ल्याचे फोटो जारी केले आहेत.

0