आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हवाई दलाला इस्रायलकडून मिळाले स्पाइस-2000 बॉम्ब

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाला बालाकोट एअर स्ट्राइकमध्ये यशस्वीरीत्या वापरलेल्या स्पाइस-२००० बॉम्बचा पहिला टप्पा मिळाला आहे. हवाई दलाच्या उच्चपदस्थ सूत्रांनी वृत्तसंस्थेला सांगितले की, इस्रायली कंपनीकडून हे बॉम्ब मिराज-२००० लढाऊ विमानाच्या ग्वाल्हेर या देशांतर्गत तळाला मिळाले आहेत, कारण हेच विमान इस्रायली बाॅम्ब फायर करण्यास सक्षम आहे. हवाई दलाने इस्रायलसोबत मार्क ८४ वॉरहेड आणि बॉम्बच्या खरेदीसाठी २५० कोटी रुपयांपेक्षा जास्त किमतीचा करार केला होता. हे बॉम्ब 'बिल्डिंग ब्लास्टर' नावाने प्रसिद्ध आहेत, ते इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त करू शकतात. नरेंद्र मोदी सरकारच्या आपत्कालीन खरेदी योजनेअंतर्गत हवाई दलाने १०० पेक्षा जास्त स्पाइस-२००० बॉम्बच्या पुरवठ्यासाठी या वर्षी जूनमध्ये इस्रायलशी एका करारावर स्वाक्षरी केली होती. भारताच्या हवाई दलाच्या मिराज-२००० विमानांनी सीमा ओलांडून पाकिस्तानमधील खैबर पख्तूनख्वा प्रांतातील बालाकोट येथील जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या अड्ड्यांवर एअर स्ट्राइक केला होता. तेव्हा मिराज विमानांनी हेच स्पाइस-२००० बॉम्ब टाकले होते. त्या वेळी इस्रायलने ते चाचणीसाठी भारताला दिले होते.

बातम्या आणखी आहेत...