आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हवाई दलाचे मालवाहू विमान 13 जणांसह बेपत्ता, आसाममधून उड्डान घेतल्यानंतर पत्ताच नाही

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली - भारतीय हवाई दलाचे विमान गेल्या तीन तासांपासून बेपत्ता आहे. हे विमान आसामच्या जोरहाट येथून सोमवारी दुपारी निघाले होते. यामध्ये 8 क्रू मेंबर्ससह एकूण 13 जण आहेत. अॅण्टोनोव्ह एएन-32 असे या विमानाचे नाव असून ते एक ट्रान्सपोर्ट प्लेन आहे. हे विमान काही मिनिटांतच अरुणाचल प्रदेशच्या मेचुका अॅडव्हांस्ड लॅन्डिंग ग्रुपवर उतरणे अपेक्षित होते. नियंत्रण कक्षाचा दुपारी 1 वाजता या विमानाशी किंचित संवाद झाला. परंतु, अचानक विमानाशी संपर्क तुटला. बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी एक विशेष टीम रवाना करण्यात आली आहे. या दरम्यान विमानाचा अपघात झाल्याचे वृत्त काही माध्यमांनी दिले. परंतु, अद्याप कुठलेही अवशेष सापडले नाहीत. विमानाची शोध मोहिम रात्रभर सुरू राहणार असे सांगण्यात आले आहे.

 

 

2016 ची ती ऐतिहासिक शोध मोहिम

भारतीय हवाई दलाचे एक एएन-32 विमान 2016 मध्ये देखील बेपत्ता झाले होते. बंगालच्या उपसागरावरून अंदमान आणि निकोबार बेटावर जात असताना विमानाशी संपर्क तुटला होता. या विमानाला शोधून काढण्यासाठी भारताने इतिहासातील सर्वात मोठी मोहिम राबविली होती. परंतु, त्या विमानाचा कधीच पत्ता लागला नाही. त्यामध्ये क्रू मेंबर्ससह 29 जण प्रवास करत होते. कालांतराने त्या सर्वांना मृत घोषित करण्यात आले होते.

बातम्या आणखी आहेत...