आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय हवाईदलात 8 अत्याधुनिक 'अपाचे' हेलिकॉप्टर्सचा समावेश; पठाणकोट हवाईतळावर केले तैनात

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पठाणकोट - अमेरिकेकडून खरेदी केलेले आधुनिक आणि अचुक मारा करण्याची क्षमता असलेले 8 अपाचे हेलिकॉप्टर मंगळवारी भारतीय हवाईदलात दाखल झाले. या सर्व हेलिकॉप्टर्सना पठाणकोट हवाईतळावर तैनात करून वॉटर केनन सॅल्यूट देण्यात आले. यावेळी एअर चीफ मार्शल बी.एस. धनोआ यांची उपस्थिती होती. अमेरिकी सरकार आणि बोइंग कंपनीकडून 2015 मध्ये 4,168 कोटी रुपयांत 22 अपाचे हेलिकॉप्टर्ससाठी करार झाला होता. 

22 अपाचे हेलिकॉप्टर्सपैकी 11 पाकिस्तानी सीमेजवळील पठाणकोट तर11 चीन सीमेजवळील आसामच्या जोरहाट येथे तैनात करण्यात येणार आहेत. यातील 8 अपाचेचा पहिला ताफा पठाणकोट येथे दाखल झाला. यामुळे पाकिस्तान आणि चीनच्या हालचालींवर नजर ठेवणे सोपे जाणार आहे. एअर चीफ मार्शल धनोआ यांनी विधान केले होते की, आम्ही 40 वर्षे जुने फायटर प्लेन उडवत आहोत. योगायोगाने त्यांच्या या विधानानंतर अपाचे हेलिकॉप्टर्स भारतीय वायुसेनेत दाखल झाले आहे. सदरील हेलिकॉप्टर्स दाखल होतेवेळी खुद्द वायुसेना प्रमुख रविवारी पठाणकोट येथे पोहोचले आहेत. 

पठाणकोट आणि पंजाबचा प्रदेश नेहमीच दहशतवाद्यांच्या निशाण्यावर राहिले आहे
पठाणकोट हवाई तळावर सध्या रशियन बनावटीचे एमआय-25 आणि एमआय-35 हेलिकॉप्टर्सचा एक ताफा तैनात आहे. लष्कराचे प्रवक्ते कर्नल देवेंद्र आनंद यांचे म्हणणे आहे की, यामुळे हवाई दलाची परिचालन क्षमता वाढेल आणि जम्मू-काश्मीरपर्यंतच्या पाकिस्तान सीमेवर एलओसी आणि आयबीपर्यंत नजर ठेवता येईल. वास्तविक पठाणकोट आणि पंजाबच्या या भागाला पाकिस्तानी दहशतवाद्यांनी आपले लक्ष्य केले आहे. दहशतवाद्यांनी 2016 मध्ये पठाणकोट हवाई तळावर हल्ला करत लढाऊ विमानांना सुरक्षित ठेवणाऱ्या तांत्रिक विभागाच्या दिशेचे जाण्याचा प्रयत्न केला होता. 

शत्रुला अंधारातही शोधून काढेल अपाचे
एएच 64 ई अपाचे जगातील सर्वांत प्रगत मल्टी कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे. यामधील सेंसर आणि उच्च प्रतिच्या नाईट व्हिजनमुळे रात्रीच्या वेळी शत्रुचा शोध घेऊन त्यास नष्ट करण्यास मदत होते. हे हेलिकॉप्टर क्षेपणास्त्रांनी परिपूर्ण असून एका मिनिटात 128 लक्ष्यांवर निशाणा साधता येतो. या हेलिकॉप्टरची गती 293 किमी प्रती तास आहे. 

आता दहशतवादी हल्ल्यावर त्वरित कारवाई करता येईल
> पठाणकोट आणि जम्मूचा सांबा व कठुआ भागाला पाकिस्तान काश्मीरची मान मानतात. काश्मीरचा संपर्क तोडण्यासाठी येथे वारंवार हल्ले करतो. 
> पंजाब आणि जम्मू-काश्मीर सीमेवर पाकिस्तानने हल्ला केल्यास त्वरित मोठी कारवाई केली जाईल.
> पाकिस्तानला लागून असलेला पठाणकोट हवाईतळ सुरक्षित असेल, येथे घुसकोली केलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेण्यासाठी 2 दिवस लागले होते. अपाचेकडे अतिरेक्यांची छायाचित्रे काढण्यासाठी आणि त्यांना कमांडोकडे पाठवण्याची उपकरणे असणार आहेत. 
> विशेषत: पाकिस्तानकडून दहशतवादी हल्ले रोखण्यासाठी अपाचे हेलिकॉप्टरची मदत होईल.
 

बातम्या आणखी आहेत...