International Special / अमेरिकेत भारतीयवंशाच्या कुटुंबातील 4 जणांच्या मृत्यूचा अखेर उलगडा झाला, पतीनेच पत्नी-मुलांना मारून आत्महत्या केली


अज्ञात हल्लेखोरांनी घरात घुसून गोळ्या झाडल्याचा पोलिसांना होता संशय
 

दिव्य मराठी वेब

Jun 18,2019 03:18:00 PM IST

वॉशिंग्टन- अमेरिकेतील आयोव्हाच्या पश्चिम डेस मोइनेस शहरात एका भारतीयाने आपली पत्नी आणि दोन मुलांची गोळी मारून हत्या केली आणि नंतर आत्महत्या केली. घटना शनिवारी घडली. सुरुवातीला पोलिसांना अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडल्याचा संशय होता. मृतांमध्ये चंद्रशेखर सुनकारा(44), लावण्या सुनकारा(41) आणि त्यांची 15 आणि 10 वर्षीय दोन मुले आहेत.


एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, शनिवारी चारही जण संशयास्पद अवस्थेत मिळाले होते. शेजाऱ्यांनी पोलिसांना माहिती दिल्यावर प्रकरण समोर आले. घटनास्थळावरून अनेक राउंड फायर झालेले मिळाले. चंद्रशेखर मागील 11 वर्षांपासून इन्फॉर्मेशन टेक्नोलॉजी डिपार्टमेंटमध्ये कार्यरत होता.


आंध्र प्रदेशचे चंद्रशेखर आयटी प्रोफेशनल होता
आयोव्हा पोलिस विभागाच्या डीपीएसने सांगितले की, आंध्र प्रदेशचा चंद्रशेखर आयटी प्रोफेशनल होता. तो येथे टेक्नोलॉजी सर्विस ब्यूरो डिपार्टमेंटमध्ये काम करत होता. या घटनेमुळे त्याच्या कुटुंबीय आणि मित्रांना जबर धक्का बसला आहे.

X
COMMENT