आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian American Lawmaker Pramila Jaipal Introduced A Resolution To Lift Limitation From Kashmir In House Of Representatives

भारतीय वंशाच्या महिला खासदार प्रमिला जयपाल यांनी अमेरीकेतील संसदेत काश्मीरमधून निर्बंध हटवण्याची मागणी केली

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • या मागणीविरोधात अनेकवेला भारतीयांनी जयपाल यांच्या ऑफिसबाहेर प्रदर्शन केले आहेत

वॉशिंग्टन- भारतीय वंशाच्या अमेरिकेतील महिला खासदार प्रमिला जयपाल यांनी काश्मीरमधून निर्बंध हटवण्याचा प्रस्ताव शनिवारी कनिष्ठ संसदे(हाउस ऑफ रिप्रेजेंटेटिव्स)त सादर केला. त्यांच्या या प्रस्तावाला मागील अनेक दिवसांपासून अमेरीकेत विरोध होत आहेत. काही दिवसांपूर्वीच अमेरिकेतील भारतीयांनी त्यांच्या ऑफीसबाहेर प्रदर्शन केले होते.

प्रमिला जयपाल यांच्याकडून सादर केलेल्या प्रस्तावात काय आहे ?
 
प्रस्तावात भारत सरकारकडे अपील केली आहे की, लवकरात लवकर काश्मीरमधून संचारबंदी हटवली जावी. तसेच, इंटरनेट सुविधादेखील सुरू करावी. प्रस्तावात हेदेखील आहे की, जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षादलांना खूप त्रासाचा सामना करावा लागतोय. त्याशिवाय सीमेपलीकडून येणाऱ्या दहशतवाद्यांचाही धोका आहे. त्यामुळे लष्कराने राज्यात शांती स्थापन करुन, स्थानिक पातळीवर वाद होऊ देऊ नये.
संसदेत सादर केलेल्या प्रस्तावात दावा केला आ हे की, नजरकैदेत असलेल्या लोकांकडून कडक नियमांच्या बॉन्डवर स्वाक्षरी करुनच सोडले जात आहे. या नियमांअंतर्गत बाहेर येताच त्यांना भाषण देता येणार नाही आणि राजकारणात सक्रीय होता येणार नाही. प्रमिला जयपाल यांनी सादर केलेल्या प्रस्तावास कंसासचे एक रिपब्लिकन खासदार स्टीव वाटकिंस यांचाच पाठींबा मिळाला आहे. हा एक साधारण प्रस्ताव आहे, ज्यावर सीनेटमध्ये मतदान होऊ शकत नाही. तसेच, याला लागू करण्यासाठी कोणताही दबाव आणला जाऊ शकत नाही. त्यामुळेच प्रमिला यांच्या प्रस्तावाकडे जास्त गांभीर्याने पाहीले जात नाहीये.