आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाची श्रुती बनली हार्वर्ड विद्यापीठाच्या विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष; 1992 पूर्वी चेन्नईत राहायचे आई-वडील

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन - भारतीय वंशाची अमेरिकन विद्यार्थिनी सर्वात प्रतिष्ठित विद्यापीठांपैकी एक हार्वर्डच्या विद्यार्थी परिषदेची अध्यक्ष बनली आहे. श्रुती पलानिअप्पन (20) हिचे पालक 1992 मध्ये चेन्नईतून अमेरिकेत स्थायिक झाले होते. तिची ही निवड विद्यापीठाच्या अंडरग्रॅज्युएट काउन्सिलवर झाली आहे. श्रुतीची सहकारी जुलिया ह्युसाला उपाध्यक्ष करण्यात आले आहे. 


कार्यकाळाच्या सुरुवातीला आपण आणि ह्युसा विद्यार्थ्यांशी चांगला संवाद प्रस्थापित करतील. सोबतच, विद्यार्थ्यांच्या मदतीने आपले कामकाज आणखी कसे सुधारता येईल याचे व्यवस्थापन केले जाणार आहे. कुठल्याही कामाची सुरुवात करण्यापूर्वी विद्यार्थ्यांशी चांगले कम्युनिकेशन हेच आपले ध्येय राहील असे श्रुतीने म्हटले आहे. जुलै 2016 मध्ये डेमोक्रेटिक पक्षाच्या राष्ट्रीय समारंभात सहभागी झालेली श्रुती सर्वात युवा कार्यकर्ता होती. श्रुती आणि ह्युसा यांनी मेक हार्वर्ड होम या घोषवाक्यासह आपला प्रचार केला होता. त्या दोघींनी एकूण मतांपैकी तब्बल 41.5 टक्के मते मिळविली आहेत. त्यांच्या सर्वात जवळच्या प्रतिस्पर्धींना फक्त 26 टक्क्यांवर समाधान मानावे लागले.

बातम्या आणखी आहेत...