आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शक्तीशाली सैन्याच्या क्रमवारीत भारताला मिळाले हे स्थान, पाकिस्‍तान टॉप 15 तूनही बाहेर

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नवी दिल्ली : भारतीय सेना विश्वातील चौथ्या क्रमांकाची ताकदवर सेना बनली आहे. द स्पेक्टेटर इंडेक्‍सच्या रिपोर्टच्या मते भारतीय सेनेने टॉप पाचमध्ये आपले स्थान प्राप्त केले आहे. या रिपोर्टमध्ये पाकिस्‍तानला टॉप पंधरामध्येही मिळवता आली नाही. या यादीमध्ये अमेरिकन सैन्याला विश्वातील सर्वात शक्तीशाली सैन्याच्या रूपात मान्यता देण्यात आली आहे. तर रशियाला दुसरा क्रमांक देण्यात आला आहे. तिसऱ्या क्रमांकावर चीन असून भारतीय सेनेची ताकद चौथ्या क्रमांकावर दाखवली आहे. 

 

या रिपोर्टनुसार जगामध्ये पु्न्हा एकदा आशियाचा डंका वाजाताना दिसत आहे. द स्पेक्टेटर इंडेक्‍स रिपोर्टच्या मते, सैन्य बलाच्या बाबतीत टॉप पाचमध्ये चीन आणि भारताने जागा प्राप्त केली आहे. या सूचीमध्ये फ्रान्सला पाचव्या क्रमांकावर स्थान देण्यात आले आहे. भारतीय नौदलाला पाचव्या क्रमांकाची सर्वात विशाल नौसेनेचा दर्जा देण्यात आला आहे. भारतीय सेनेची ताकद वाढताना दिसत आहे. सध्या भारतीय लष्करात 13 लाखांहून अधिक सैनिकांचा समावेश आहे. 

 

टॉप 10 मध्ये इतर वैश्विक सैन्याची ताकदीविषयी सांगायचे झाले तर यामध्ये ब्रिटनचा सहावा क्रमांक लागतो. कोरिया सात तर दक्षिण कोरियाचा आठवा क्रमांकावर जागा मिळाली आहे. यामध्ये जर्मनी दहाव्या स्थानावर विराजमान आहे. या यादीमध्य अकरावा क्रमांक इटलीचा तर बारावा क्रमांक इराणचा येतो. 

 

पुढील स्लाइडवर क्लिक करून जाणून घ्या कोणत्या देशाकडे किती सैन्य बजट आणि एकूण सैन्य बळ आहे

बातम्या आणखी आहेत...