आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

LOC वर घुसखोरांची मदत करणाऱ्या 2 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा, भारतीय लष्कराची कारवाई

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - नियंत्रण रेषेवर तैनात भारतीय जवानांनी घुसखोरांची मदत करणाऱ्या पाकिस्तानच्या दोन सैनिकांना सोमवारी रात्री उशीरा ठार मारले आहे. तंगधार सेक्टर परिसरात हे पाकिस्तानी सैनिक एलओसीवरून भारतात घुसखोरी करू पाहणाऱ्यांची मदत करत होते. सुरुवातीला पाकिस्तानकडून भारताच्या दिशेने गोळीबार झाला. त्याचेच चोख प्रत्युत्तर दिल्यानंतर 2 पाकिस्तानी सैनिक मारले गेले. संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, कुठल्याही प्रकारच्या चिथावणीविना पाकिस्तानने भारतीय सैनिकांच्या दिशेने गोळीबार केला. अशाच प्रकारे वारंवार गोळीबार करून शस्त्रसंधीचे उल्लंघन करत घुसखोरांना मदत केली जात आहे. अशाच घटना रोखण्यासाठी सैनिकांनी ही कारवाई केली आहे. 


2 दिवसांत 2 भारतीय शहीद
गेल्या दोन दिवसांपासून घुसखोरी विरोधात चोख बंदोबस्त तैनात करून मोहिमा राबवल्या जात आहेत. त्याच मोहिमेत भारताचे 2 जवान शहीद झाले आहेत. तंगधार सेक्टरमध्ये नियंत्रण रेषा परिसरात सोमवारी रात्री उशीरा घुसखोरीचा प्रयत्न करण्यात आला होता. भारतीय जवानांनी घुसखोरीचा हा कट उधळून लावला आहे. या मोहिमेत भारतीय लष्कराचे जवान पुष्पेंद्र सिंग शहीद झाले. तत्पूर्वी रविवारी संध्याकाळी बारामूला येथील रुस्तम पोस्ट परिसरात आणखी एक जवान शहीद झाला होता. 

 

यापूर्वीही उधळला घुसखोरीचा कट
6 ऑगस्ट रोजी लष्कराने बांदीपोरा जिल्ह्यातील गुरेज सेक्टरमध्ये एलओसीवर घुसखोरीचा कट उधळून लावला होता. त्यावेळी सुद्धा पाकिस्तानने भारताच्या दिशेने फायरिंग केली आणि भारताला प्रत्युत्तर द्यावे लागले. पाकिस्तान गोळीबार करून भारतीय सैनिकांचे लक्ष विचलित करत घुसखोरांना भारतात पाठवण्याचा प्रयत्न करत होता. सैनिकांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला तेव्हा पाकिस्तानने त्यांच्यावर गोळीबार सुरू केला. त्या गोळीबाराला दिलेल्या प्रत्युत्तरात दोन घुसखोर दहशतवादी ठार मारले गेले. सोबतच भारतीय सैनिकाचे एक मेजर आणि 3 जवान शहीद झाले.

 

बातम्या आणखी आहेत...