आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भूतानमध्ये भारतीय लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, दोन पायलट शहीद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

थिम्पू- भारतीय लष्कराचे "चीता" हेलिकॉप्टर आज(शुक्रवार) भूतानमध्ये क्रॅश झाले. या भीषण अपघातात हेलिकॉप्टरमध्ये असलेल्या  दोन पायलटचा दुर्दैवी मृत्यू झाला. लष्कराने सांगितल्यानुसार, शहीदांध्ये भारतीय लष्करातील लेफ्टिनेंट कर्नल रँकचे पायलट आणि भूटानी लष्करातील पायलटचा समावेश आहे. भूतानी पायलट
भारतीय लष्करासोबत प्रशिक्षण घेत होते.

भारतीय लष्कराचे प्रवक्ते कर्नल अमन आनंद यांनी सांगितले की, हे हेलिकॉप्टर भूतानमध्ये योंगफुल्लाजवळ दुपारी 1 वाजता क्रॅश झाले. हेलिकॉप्टरशी 1 वाजेनंतर रेडिओ आणि व्हिजूअल संपर्क तुटला होता. 

बातम्या आणखी आहेत...