आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • National
  • Indian Army Jawan Anuj Kumar Gets Hero Welcome After Winning Gold Medal 11th World Body Building Championship

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

भारतीय लष्कराच्या जवानाने वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकला गोल्ड, जंगी स्वागत

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

बंगळुरू - भारतीय लष्करातील हवालदार अनुज कुमार तेलियान यांनी 11 व्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप 2019 मध्ये गोल्ड मेडल मिळवले आहे. बंगळुरूचे असलेले अनुज कुमार यांचे मद्रास इंजीनिअर्स ग्रुपच्या वतीने जंगी स्वागत करण्यात आले. अनुज यांनी वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिपच्या 100+ किलो वजनी गटात सोनेरी कामगिरी केली आहे. अनुज कुमार भारतीय लष्करात मद्रास इंजीनिअर ग्रुपचे सदस्य आहेत.

11 व्या वर्ल्ड बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप 2019 चो आयोजन दक्षिण कोरियात करण्यात आले होते. येथील जूजू बेटावर 5 ते 11 नोव्हेंबर रोजी ही चॅम्पियनशिप रंगली होती. यामध्येच भारताचे चित्रेश नटसन यांना मिस्टर यूनिवर्स 2019 चा खिताब देण्यात आला आहे. यासोबतच, भारताच्या बॉडी बिल्डर्सने वर्ल्ड बॉडी बिल्डिंग अॅन्ड फिजिक स्पोर्ट्स चॅम्पियनशिपच्या टीम कॅटेगिरीमध्ये सुद्धा विशेष कामगिरी करत दुसरे क्रमांक पटकावले आहे.

बातम्या आणखी आहेत...