आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Indian Army Killed Pakistani Soldiers In Jammu And Kashmir Poonch, Rajouri Sector Ceasefire Violation Today News And Updates

एलओसीवरील गोळीबारानंतर भारतीय सैन्याचे चोख प्रत्युत्तर, 4 पाकिस्तानी सैनिकांचा खात्मा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

श्रीनगर - पाकिस्तानकडून जम्मू-काश्मिर नियंत्रण रेषेवर वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन होत आहे. पाकिस्तानी सैन्यांनी गुरुवारी रात्री पुन्हा पुंछ आणि राजौरी भागात गोळीबार केला. लष्करी सुत्रांच्या मते, भारतीय सैन्याने एलओसीवर पलीकडून होणाऱ्या गोळीबाराला चोख प्रत्युत्तर दिले. या कारवाईत पाकिस्तानचे 4 सैनिकांचा खात्मा करण्यात आला.सीमेवरील सुरक्षेबाबत संपूर्ण देशाला आत्मविश्वास हवा - राजनाथ सिंह


भारताच्या प्रत्युत्तर पीओकेच्या देवा भागात पाकच्या दोन सैनिकांचा मृत्यू झाल्याचे इमरान सरकारने बुधवारी मान्य केले होते. उरी भागात केल्या गेलेल्या शस्त्रसंधीच्या उल्लंघनानंतर ही कारवाई करण्यात आली होती. या हल्ल्यात लष्कराचा एक अधिकारी शहीद झाला होता तर एक महिलेला आपला जीव गमवावा लागला होता. शस्त्रसंधीच्या उल्लंघनावर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले की, सीमेवरील सुरक्षेबाबत संपूर्ण देशाला आत्मविश्वास हवा. आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील. भारतीय लष्कर प्रत्युत्तर देण्यास पूर्णपणे सक्षम आहे. 

भारतीय हल्ल्यांपासून वाचण्यासाठी पीओकेच्या नागरिकांना ढाल बनवले


पाक भारतीय हल्ल्यांपासून वाचण्यासाठी नियंत्रण रेषेवरील नागरिकांना ढाल बनवत आहे. पाक सैन्याप्रति लोकांत वाढत असलेला अविश्वास लक्षात घेऊन पंतप्रधान इम्रान खान यांनी गुरुवारी नियंत्रण रेषेवरील लोकांना वस्ती न सोडण्यासाठी आर्थिक मदतीची घोषणा केली. नियंत्रण रेषेनजीकच्या दोन किमी कक्षेत वास्तव्यास असलेल्या 33,498 कुटुंबांतील सर्व विवाहित महिलांना दर महिन्याला 10 डॉलर (1546 पाकिस्तानी रुपये) मिळतील. अट एकच, या कुटुंबांनी सीमा सोडायची नाही. सीमा सोडल्यास आर्थिक मदत परत घेतली जाईल.5 ऑगस्टनंतर शस्त्रसंधी उल्लंघनाच्या घटना वाढल्या


पाकिस्तान बऱ्याच दिवसांपासून मोर्टारच्या सहाय्याने भारतीय सीमेवरील निवासी भागांना लक्ष्य करीत आहे. 21 आणि 22 डिसेंबरच्या रात्री पाक सैन्यांनी काश्मीरच्या मेंढर, कृष्णा खोरे आणि पुंछमध्ये गोळीबार केला होता. 5 ऑगस्ट रोजी जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानकडून शस्त्रसंधी उल्लंघन करण्याच्या घटनांत वाढ झाली आहे.