आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अफगाणविरुद्ध भारतीय संघातील फलंदाजांच्या चुका; बचावात्मक खेळ, सुमार फटके, नियोजनाच्या अभावाने भारतीय फलंदाजीचा उडाला गोंधळ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

लंडन - ५० षटकांत २२४ धावा. डावाचा रनरेट ४.४८. हे अफगाणिस्तानविरुद्ध शनिवारी साउथम्प्टनमध्ये झालेल्या सामन्यातील भारतीय टीमचे प्रदर्शन आहे. आकड्यानुसार २०१० नंतर ५० षटकांच्या सामन्यात भारताची ही सर्वात नीचांकी धावसंख्या आहे. टीम इंडियाच्या फलंदाजांचे असे प्रदर्शन आतापर्यंत विश्वचषकात एकही सामना न गमावल्यानंतर अफगाणिस्तानविरुद्ध झाले. भारत आणि अफगाणिस्तान दोन्ही संघांत आकाश-पाताळाचे अंतर आहे. भारतीय टीम वनडे क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर आणि अफगाणिस्तान दहाव्या क्रमांकावर आहे.

अफगाणिस्तानच्या गोलंदाजांपुढे भारतीय फलंदाज संघर्ष करताना दिसले. उलट गेल्या सामन्यात इंग्लंडच्या फलंदाजांनी ३९७ धावा काढल्या. स्टार फिरकीपटू राशिद खानच्या ९ षटकांत ११० धावा आल्या. त्यामुळे राशिद व त्याच्या सहकाऱ्यांचे मनोबल खचले असेल. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.  भारतीय टीमची फलंदाजीची रणनीती सुरुवातीला फसली. त्यांनी एकानंतर एक अनेक चुका केल्या. 
 

फलंदाज संथ खेळपट्टीवर अपयशी 
संथ खेळपट्टीवर फलंदाज स्वत:ला एकरूप करू शकले नाहीत. गरजेपेक्षा अधिक बचावात्मक खेळ केला. कोहलीने नाणेफेक जिंकून फलंदाजी घेतली. ते इतके बचावात्मक झाले की जणू त्यांची फलंदाजीची परीक्षा आहे. गोलंदाजीत युवा फिरकीपटू मुजीब उर रहमानने दोन षटके रोहित शर्माला बांधून ठेवले आणि तिसऱ्या षटकात तो दबावात आला व बाद झाला. याच रोहितने पाक व आफ्रिकेविरुद्ध शतक ठोकले होते. १८ जून रोजी इंग्लंडने अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना डोक्यावर बसू दिले नाही. 

 

विकेटची किंमत नाही, चुकीचा फटका खेळून बाद 

कर्णधार कोहली अाक्रमक पद्धतीने मैदानात उतरला. कोहली आणि लाेकेश राहुलने अर्धशतकी भागीदारी केली. मात्र, लोकेशने खराब फटका खेळून अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना पुनरागमन करण्याची संधी दिली. विजय शंकर चांगला स्वीप शॉट खेळू शकला नाही, तरीदेखील त्याने स्वीप खेळत आपली विकेट भेट दिली. तोदेखील फिरकीपटूंसमोर अडचणीत दिसला. 

 

नियोजन फिसकटले, ऋषभ पंतला संधी न देण्याची चूक 
गेल्या वर्षी आशिया कपमध्ये अफगाणिस्तान टीम भारताविरुद्ध सामना बरोबरीत राखण्यात यशस्वी ठरली होती. तरीदेखील भारतीय संघ व्यवस्थापनाने त्या सामन्याचा विचार करून नियोजन केले नाही. संथ गतीच्या खेळपट्टीवर अफगाणिस्तानच्या फिरकीपटूंविरुद्ध काही अभ्यास केल्याचा कोणताही फलंदाज दिसला नाही. दुसरीकडे आयपीएलमध्ये भारतीय फलंदाजांनी राशिद खान व मुजीब उर रहमानचा सामना केला आहे. ऋषभ पंत विरोधी गोलंदाजांना दबावात आणू शकतो, मात्र त्याचा समावेश करण्यात आला नाही. त्याचाही टीमला फटका बसला.

बातम्या आणखी आहेत...