आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय वंशाच्या हॅरिसचे ट्रम्पसाठी कडवे आव्हान

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंग्टन- अनेक कमतरता असतानाही मूळ भारतीय वंशाच्या कमला हॅरिस या अमेरिकेतील राष्ट्रपती निवडणुकीमध्ये डेमोक्रॅटिक पक्षाच्या उमेदवारीसाठी प्रबळ दावेदार मानल्या जात आहेत. राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांना कडवे आव्हान देणाऱ्या नेत्या म्हणून अनेक जण त्यांच्याकडे बघतात. सक्रियता त्यांना त्यांच्या आईवडिलांकडून वारसारूपाने मिळाली आहे.
 
आपल्या संकल्पना मध्यमवर्गीयांच्या समस्या सोडवण्याचा मार्ग असल्याचे त्या सांगतात. तरी त्या लोकांचे जास्त लक्ष वेधून घेऊ शकल्या नाहीत. जर मतदार स्पष्ट आणि महत्त्वाकांक्षी दृष्टिकोनाची अपेक्षा करत असतील तर त्यांचा अजेंडा अस्पष्ट व अश्वासक नाही असे डेमोक्रॅटिक समर्थक विचार करतात. जानेवारीत जोरदार सुरुवात केल्यावर हॅरिस यांची मोहीम थंडावली . परंतु उमेदवारीच्या स्पर्धेत त्या आहेत. राष्ट्रीय व राज्याच्या सर्वेक्षणात त्यांची लोकप्रियता ५-६ अंकांच्या दरम्यान आहे. आरोग्यसेवा, स्थलांतर या महक्त्वाच्या धोरणात्मक विषयांवर त्यांची भूमिका अस्पष्ट आहे. त्यांच्या बहुतांश भाषणांमध्ये एकतेवर भर असतो असे टीकाकार म्हणतात.
 
डेमोक्रॅटिक पक्षाच्या पाच प्रबळ दावेदारांमध्ये त्याच्या मानांकनात सातत्य आहे. त्यांनी ३० सप्टेंबरपर्यंत ८२ कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी गोळा केला होता. मतदारांच्या बदलत्या दृष्टिकोनाचा त्यांना फायदा मिळू शकतो. नशिबाने साथ दिली तर त्या उमेदवार बनू शकतात.दुसरीकडे पक्षाच्या अनेक बड्या दावेदारांमध्ये नरमाई दिसत आहे. माजी उपराष्ट्रपती बायडन सगळ्यात पुढे आहेत, पण चर्चेतील खराब कामगिरीमुळे त्यांना बाहेर जावे लागू शकते.