आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमित पंघलसह 6 भारतीय मुष्टीयोद्धे टोकियो ऑलंपिकसाठी पात्र, वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणारा मनीष कौशिक पराभूत

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
  • अमितने 52 किलो कॅटेगरीमध्ये फिलीपीन्सच्या कॅरलो पालमला 4-1 ने पराभूत केले

स्पोर्ट डेस्क- भारताचा स्टार बॉक्सर अमित पंघलसहित 6 मुष्टीयोद्धे टोकियो ऑलंपिकासाठी पात्र ठरले आहेत. परंतू, वर्ल्ड बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये ब्रॉन्ज मेडल जिंकणारा मनीष कौशिकला 63 किलोग्राम कॅटेगरीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला आहे. सर्व 6 बॉक्सरनी आशिया/ओसनिया ऑलिंपिक क्वालिफायर टूर्नामेंटमध्ये आपापल्या क्वार्टरफायनल सामन्यात विजय मिळवून सेमीफायनलमध्ये धडक मारली आहे. 

या मुष्टीयोद्ध्यांनी विजय मिळवला


अमित पंघल (52 किलोग्राम)

विकास कृष्णन (69 किलोग्राम)

पूजा रानी (75 किलोग्राम)

लवलीना बोर्गोहेन (69 किलोग्राम)

आशीष कुमार (75 किलोग्राम)

सतीश कुमार (91 किलोग्राम) 

अमितचा सोपा विजय


अमितने सोमवारी आपल्या 52 किलोग्राम कॅटेगरीमध्ये फिलीपीन्सच्या कॅरलो पालमला 4-1 ने पराभूत केले. सेमीफायनलमध्ये अमितसमोर चीन हू जियानगुन लढणार आहे. विकास कृष्णनने रविवारी 69 किलोग्राम कॅटेगरीमध्ये जापानच्या सेवोनरेट्स ओकाजावाला 5-0 ने पराभूत केले. या विजयासोबतच तीन वेळा ऑलंपिकसाठी क्वालीफाय करणारा विजेंदर सिंहनंतर दुसरा भारतीय बनला आहे.

बातम्या आणखी आहेत...