आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराइंदूर - मानसिक समाधानासाठी ब्रेक घेण्यास नकारात्मक दृष्टिकोनातून पाहिले जाऊ नये, असे भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने म्हटले आहे. त्याने २०१४ मध्ये आपणास येणाऱ्या अपयशाची आठवण सांगताना बुधवारी म्हटले, ‘मीसुद्धा करिअर घडवत असताना या प्रसंगातून गेलो आहे. त्या वेळी सर्वकाही संपले, हे जग आता माझे उरले नाही. काय करावे, कुणाला सांगावे, कुणाला काय बोलावे, याची मला काहीच कल्पना येत नव्हती. त्या वेळी मी मानसिकदृष्ट्या खचलेलो आहे हेेही सांगू शकत नव्हतो. मला क्रिकेट सोडून द्यावेसे वाटत आहे, असेही सांगता येत नव्हते. हे तुम्हाला कसे वाटेल याचीही मला कल्पना नाही, असे तो म्हणाला. तेव्हा दौऱ्यात विराटने ५ चाचण्यांमध्ये दहा डावांत सरासरी १३.५० च्या हिशेबाने १३४ धावा केल्या होत्या.’ विराटने हे मनोगत ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू ग्लेन मॅक्सवेलच्या संदर्भात बोलताना मांडले. ग्लेन याने मानसिक स्वास्थ्याचे कारण देत काही काळ क्रिकेटपासून दूर राहण्याची घोषणा केली. विराट म्हणाला, मॅक्सवेल याने जगभरातील क्रिकेटपटूंसमोर वस्तुपाठ घालून दिला आहे. मॅक्सवेलने जे केले ते कौतुकास्पद आहे. धाडसी व एक आदर्श घालून देणारे आहे. जर तुमची मन:स्थिती ठीक नसेल तर तुम्ही फक्त प्रयत्न... प्रयत्न आणि प्रयत्नच करू शकता. कुणीही कधी ना कधी अशा अवस्थेत जाऊ शकते. येथे तुमचे वागणे बदलते किंवा वेळ हवा असतो. तुम्ही हार मानावी, असे नाही. परंतु काही बाबी स्पष्ट करण्यासाठी तुम्ही थोडा अवधी घेतला पाहिजे. माझ्या दृष्टीने तेच योग्य आहे. मला वाटते, या गोष्टींचा तुम्ही आदर केला पाहिजे.
असे कुणासोबतही घडू शकते, त्याकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहा
बांगलादेशाविरोधात गुरुवारी इंदुरात सुरू होत असलेल्या चाचणी सामन्याच्या एक दिवस आधी कोहली म्हणाला, असे कुणासोबतही घडू शकते. म्हणून या निर्णयास खूप सकारात्मक दृष्टिकोनातून पाहावे लागेल. तुम्ही आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचता तेव्हा संघातील प्रत्येक खेळाडूस बोलण्यासाठी प्रेरित करावे, म्हणून अशी चर्चा करणे आवश्यक आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.