Home | Gossip | Indian celebrities spotted while voting for election 2019

आमिर, अजय आणि काजोलसह या सर्व सेलिब्रिटीजने केले मतदान, सर्वांनीच जनतेला केले मतदान करण्याचे आवाहन 

दिव्य मराठी वेब टीम  | Update - Apr 29, 2019, 11:48 AM IST

माधुरी, टायगर आणि प्रियांका चोप्रा यांनाही मतदानाला लावली हजेरी... 

 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी आज वोटिंग होत आहे. मुंबईच्या 6 जागांवर आज हे वोटिंग झाले आहे. यावेळी अजय देवगन, काजोल, आमिर खान, रेखा आणि प्रियांका चोप्रासाह बॉलिवूडच्या अनेक सेलिब्रिटीजने मतदान केले.

  पुढे पहा इतर सेलेब्रेटींचे फोटोज...

 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  प्रियांका चोप्रा सध्या मुंबईमधेच आहे. अशातच ती अमेरिकेहून परतली आहे. प्रियांका चोप्रा आपली आई मधु चोप्रासोबत मतदान करायला पोहोचली होती. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर प्रियंकाने अशातच शोनाली बोसची फिल्म 'द स्काय इज पिंक'चे शूटिंग केले आहे. फिल्ममध्ये फरहान अख्तर आणि जायरा वसीम यांच्या मुख्य भूमिका आहेत. ही फिल्म 11 ऑक्टोबरला रिलीज होणार आहे. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  अभिनेते आणि बीजेपी नेता परेश रावल वोट दिल्यानंतर स्पॉट झाले. परेश रावल आपल्या पत्नीसोबत वोट देण्यासाठी आले होते. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे तर काही दिवसांपासून चर्चा आहे की, अक्षय कुमार, परेश रावल आणि सुनील शेट्टीची सुपरहिट कॉमेडी फिल्म 'हेरा फेरी' चा सीक्वल बनवला जाऊ शकतो. 
   
  #pareshrawal #elections2019 #indiavotes #mumbaikarvote #bollywoodvotes @viralbhayani

  A post shared by Viral Bhayani (@viralbhayani) on Apr 28, 2019 at 7:16pm PDT

 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  माधुरी दीक्षितने मुंबईमध्ये मतदान केले. यावेळी तिने यलो कलरच्या टॉपसोबत व्हाइट कलरची पॅन्ट घातली होती. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  भोजपुरी फिल्मचे सुपरस्टार रवि किशनने गोरेगावमध्ये आपले वोट दिले. रवि किशन यावेळी स्वतःदेखील निवडणूक लढवत आहेत. त्यांना बीजेपीकडून यूपीच्या गोरखपुर मधून तिकीट दिले गेले आहे. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  'रंगीला गर्ल' उर्मिला मातोंडकर हीदेखील सकाळी सकाळी वोट देण्यासाठी पोहोचली. उर्मिला स्वतःदेखील काँग्रेसमधून निवडणूक लढवत आहेत. फिल्मबद्दल बोलायचे तर उर्मिला शेवटची फिल्म ब्लॅकमेलमध्ये आयटम नंबर कर्तनाब दिसली होती. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  आपल्या स्टंटसाठी प्रसिद्ध असलेला अभिनेता टायगर श्रॉफनेदेखील मतदान केले. टायगरला अहमदाबादसाठी निघायचे आहे त्यापूर्वी त्याने आपली आपली ही महत्वाची जबाबदारी यथोचित पार पडली. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  अजय देवगण आणि काजोलसोबतच मतदान स्थळावर पोहोचले. यादरम्यान त्याच्यासोबत मुलगा युगदेखील स्पॉट झाला. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  आमिर खानदेखील पत्नी किरण रावसोबत वोट देण्यासाठी पोहोचला होता. वोट दिल्यानंतर त्यांनी सोबत पोज दिल्या. 
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  मुंबईच्या वांद्र्यामध्ये वोट दिल्यानंतर रेखा यांनी शाई लागलेल्या बोटासोबत पोज दिली. रेखा या नेहमी मतदान करतात. यावेळी त्यांनी व्हाइट कलरचे सलवार-सूट घातले होते.  
   
 • Indian celebrities spotted while voting for election 2019

  दिया मिर्झा आणि महेश भट्ट यांनीदेखील केले मतदान. 
   
Trending