आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गर्दीमुळे पोलिस प्रशासनाने एमजी रोडवरच अडवला भाकपचा मोर्चा

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अकोला- कामगार, कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर आज, गुरुवारी ऑगस्ट क्रांतीदिनी भारतीय कम्युनिस्ट पक्षाने (भाकप) मोर्चा काढला. दरम्यान सरकारी कर्मचाऱ्यांचा संप, सकल मराठ्यांचा ठिय्या आणि जिल्हाकचेरीवरील इतर आंदोलनांमुळे पोलिसांनी एमजी रोडवरच भाकपचा ताफा अडवला. त्यानंतर एका प्रतिनिधी मंडळाने जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. 


भाकप व आयटकचे जिल्हा सचिव रमेश गायकवाड, अॅड. एस. एन. सोनोने, भा. ना. लांडे गुरूजी, पेन्शनर्सचे पुढारी देवराव पाटील, अंगणवाडी सेविकांच्या नेत्या सुनीता पाटील, आयटकचे नयन गायकवाड आदींनी या आंदोलनाचे नेतृत्व केले. आंदोलनाच्या प्रारंभी तथागत गौतम बुद्ध, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व क्रांतिसूर्य ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यात आले.आंदोलनात दुर्गा देशमुख, सरोज मूर्तिजापुरकर, अनिता भटकर, रामदास ठाकरे, मदन जगताप, एस. वाय. दुधाळे, एम.पी. काळणे, कुरुमदास गायकवाड, अक्षय गायगोले, भूषण गुळधे, सुहास अग्निहोत्री, सुमीत गायकवाड यांच्यासह भाकप व आयटकचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. 

बातम्या आणखी आहेत...